#VIDEO: कोरोना म्हणजे अल्लाहने दिलेली शिक्षा म्हणणाऱ्या मुस्लिम धर्मगुरूला कोरोनाची लागण
तेहरान, १६ मार्च : कोरोना विषाणूने माजवलेल्या थैमानात आतापर्यंत ६ हजारहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. स्पेनमधील मृतांचा आकडा वाढल्यानंतर जगभरातील कोराने जीव गमावलेल्यांचा आकडा ६ हजारपेक्षा अधिक झाला आहे. स्पेनमध्ये मागील २४ तासांत १०५ लोकांनी जीव गमावला आहे. स्पेनमधील आकडेवारीनंतर जगभरात कोरोनाने मृत पावलेल्यांचा आकडा हा ६ हजार ३६ वर पोहचला आहे. १ लाख ६२ हजार ४६७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून एकट्या स्पेनमध्ये २४ तासांत दोन हजार नवे रुग्ण आढळले आहेत.
चीननंतर इटलीमध्ये करोनाचा उद्रेक झाला असल्याची स्थिती आहे. इटलीत करोनामुळे होणाऱ्या बळींची संख्या वाढत आहे. मागील २४ तासांत इटलीत ३६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या परिस्थितीतही काही जण विचित्र अशा प्रतिक्रिया देत आहेत. अशीच प्रतिक्रिया देणाऱ्या मुस्लिम धर्मगुरूलाच कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.
‘कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव म्हणजे अल्लाहने चीनला दिलेली शिक्षा आहे’, असं वक्तव्य इराकमधील शिया नेते आणि मुस्लिम धर्मगुरू हादी अल मोदारीस यांनी केलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या या व्यक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मोदारीस यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र मोदारीस यांनी हे वक्तव्य केल्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनाच करोनाव्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झालं. त्यावरूनही अनेकांनी त्यांना ऐकवलं आहे.
‘चीनमधील अत्याचारी प्रशासनाने १० लाखांहून अधिक मुस्लिमांना नजरकैदेत ठेवलं होतं. त्यामुळे या चीनी लोकांना शिक्षा देण्यासाठी अल्लाहने हा विषाणू पाठवला आणि आज चीनमधील ४० लाख लोकं नजरकैदेत आहेत. ज्या नकाबची ते मस्करी करत होते आज तेच त्यांना घालावे लागत आहे. अल्लाहने देशातील सरकारी यंत्रणा आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्त्रीच नाही तर पुरुषांनाही नकाब घालण्यास भाग पाडलं,” असं मोदारीस म्हणाले होते.
Iraqi Islamic Scholar Hadi Al-Modarresi, Prior to Being Infected with Coronavirus: The Virus Is a Divine Punishment against the Chinese pic.twitter.com/7NiQki6qBy
— MEMRI (@MEMRIReports) March 9, 2020
News English Summery: Corona virus is widespread worldwide. The virus spread its footprint in more than 100 countries, killed over 5,000 people and killed more than 1 million people. Even in this situation, some are reacting strangely. Corona virus has been infected by Muslim clerics who have reacted similarly. Iraqi Islamic scholar Hadi Al-Modarres said that the outbreak of the corona virus was a punishment from Allah to China. A few days ago, a video of his statement went viral. ‘The tyrannical administration in China has placed more than one million Muslims in detention. Therefore, Allah sent the virus to punish these Chinese people and today there are 4 million people in China under arrest. They have to wear the mask they used to mock today. Allah has forced men and women to wear the mask not only through the government and the authorities in the country, “said Modaris.
News English Title: Story Corona Virus Iraqi Islamic scholar Hadi Al Modarres Iran Corona Virus China Corona Virus News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया