25 November 2024 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

लॉकडाउन'मुळे देशातील हवेच्या प्रदूषणात कमालीची घट, नासाने शेअर केले फोटो

Corona Crisis, Covid 19, Lockdown, NASA Air Pollution Photographs

वॉशिंग्टन, २३ एप्रिल: कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकाडऊनमुळे लोक घरात अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे भारतच नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मात्र यामुळे अनेक देशांमधील प्रदुषण मोठ्या प्रमाणावर कमी झालं आहे. हवेची गुणवत्ता सुधारली आहे. नद्या स्वच्छ झाल्या आहेत. भारतातही हिमालय खराब हवेमुळे दिसत नसे तो आता जालंधरमधूनही दिसते. हरिद्वार इथं गंगेचं पाणी शुद्ध झालं आहे. आता याबाबत नासानेही फोटो शेअर केले आहेत.

लॉकडाउनमुळे वातावरण अधिक सुधारले आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने भारतातील हवेच्या प्रदूषणात सुधारणा झाल्याचे म्हटले आहे. नासाने मागील चार वर्षांतील फोटो शेअर करत भारतातील हवेच्या प्रदूषणात आमुलाग्र बदल दिसत असल्याचे म्हटले आहे. नासाने मॉडरेट रिझोल्यूशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडियोमीटर टेरा सॅटेलाइटच्या माध्यमातून भारतातील दृश्य टिपले आहे. इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतातील हवेची गुणवत्ता कमालीची सुधारल्या उल्लेख नासाने केलाय.

नासाने हे फोटो मॉडरेट रिझोल्यूशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडिओमीटर (MODIS) टेरा सॅटेलाइटच्या सहाय्याने घेतले आहेत. लॉकडाऊनमुळे प्रदुषणाची पातळी वेगाने खाली आली आहे. भारतात तर प्रदुषण संपल्यासारखंच दिसत आहे. नासाने सॅटेलाइटच्या फोटोंमधून हे स्पष्ट केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये २५ मार्चपासून लॉकडाउन सुरु आहे. सुरुवातीच्या टप्प्यात १४ एप्रिलपर्यंत केलेल्या लॉकडाउनचा कालावधी १९ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. या निर्णयानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउनची स्थिती कायम राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या कालावधीत कारखाने, कंपन्या अनेक उद्योग बंद आहेत. एवढेच नाही तर वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे ठप्प आहे.

 

News English Summary: The lockdown has further improved the atmosphere. The US space agency NASA has said that air pollution in India has improved. NASA has shared photos from the last four years showing a radical change in air pollution in India. NASA has captured the scene in India through the Moderate Resolution Imaging Spectroradiometer Terra Satellite. According to NASA, India’s air quality has improved dramatically compared to other nations.

News English Title: Story corona virus lockdown affects Air Pollution NASA says Airborne particles over Northern India have dropped significantly Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x