5 November 2024 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख
x

आमच्यावर विश्वास ठेवा, खरा विनाश तर अजून दिसायचाय - WHO'चे अध्यक्ष

Corona Crisis, Covid 19, WHO, world health organisation, Tedros Adhanom Ghebreyesus

वॉशिंग्टन, २१ एप्रिल: जगभरातील २०० हून अधिक देशांमध्ये फैलावलेल्या करोनाच्या संसर्गाची २४ लाखांहून अधिकजणांना बाधा झाली आहे. करोनाने जगभरात एक लाख ७० हजारांहून अधिक बळी घेतले आहेत. युरोप आणि अमेरिकेत करोनाने थैमान घातले आहेत. मात्र कोरोनाची ही फक्त सुरुवात आहे, वाईट काळ येणं अजून बाकी आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने अफ्रिकेतून आजार पसरण्यास सुरुवात होईल असा दावा केला आहे. अफ्रिकेतील आरोग्य सेवा विकसित नसल्याने तेथून आजार पसरेल असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. “आमच्यावर विश्वास ठेवा, खरा विनाश तर अजून दिसायचाय,” असं टेड्रोस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. “हे संकट रोखायला हवं. हा एक व्हायरस आहे जो अद्यापही अनेक लोकांना समजलेला नाही,” असंही ते बोलले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अँडेनहॅम ग्रेब्रेयेसुस पुढे म्हणाले की, १९१८ च्या फ्लूप्रमाणेच कोरोनासुध्दा एक अतिशय धोकादायक संसर्गजन्य रोग आहे. १९१८ मध्ये या फ्लूने जवळपास एक कोटी लोकांचा जीव घेतला होता. त्याचप्रमाणे कोरोनाने देखील १ लाख ७० हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. परंतु कोरोनाचा उद्रेक अजूनही झालेला नाही. तसेच जगभरात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचे देखील टेड्रोस अँडेनहॅम ग्रेब्रेयेसुस यांनी सांगितले. मात्र आता आपल्याकडे तंत्रज्ञान असल्यामुळे आपण ही आपत्ती टाळू शकतो अशी प्रतिक्रिया टेड्रोस अँडेनहॅम ग्रेब्रेयेसुस यांनी दिली आहे.

 

News English Summary: The World Health Organization has claimed that the outbreak will start spreading from Africa. The World Health Organization says the outbreak will spread from Africa because health care is not developed. “Trust us, the real destruction is yet to come,” Tedros told reporters. “This crisis must be prevented. It’s a virus that many people still don’t understand, “he said.

News English Title: Story Corona virus lockdown world health organisation Chief Tedros Adhanom Ghebreyesus says worst is yet ahead of us News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x