कोरोना आपत्ती: जगभरात ११ लाखांहून अधिक रुग्ण; ६२ हजार बळी
वॉशिंग्टन डीसी, ५ एप्रिल: जगातील सुमारे २०० देशांमधील विविध रुग्णालयांमध्ये ८ लाख, ५० हजारांहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू असून त्यातील ४० हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, ८ लाख, ११ हजार रुग्णांमध्ये कोरोनीची लक्षणे अतिशय सौम्य आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
दरम्यान जगभरातील करोना बळींची संख्या आता साठ हजारांवर गेली असून अमेरिकेत एकाच दिवशी पंधराशे बळी गेले आहेत. जगात ११,३३,८०१ करोनाबाधित रुग्ण असून, बळींची संख्या ६०,३९८ झाली आहे. अमेरिका ७४०६, स्पेन ११,७४४, इटली १४,६८१, जर्मनी १२७५, फ्रान्स ६५०७, चीन ३३२६, इराण ३४५२ या प्रमाणे मृतांची संख्या आहे. चीनमधील करोना साथीचा सर्वोच्च कालखंड संपला असला, तरी तेथे पुन्हा दुसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. अमेरिका व युरोपात मास्कचा तुटवडा असून ते चीनवर अवलंबून आहेत. न्यूयॉर्कमध्ये लोकांना मास्क लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एकूण २,७८,००० अमेरिकी लोकांच्या चाचण्या सकारात्मक आल्या असून दर दहापैकी नऊ लोक टाळेबंदीत आहेत.
दरम्यान, ट्रम्प यांनी लष्कराची उपाययोजनांमधील भूमिका वाढवत असल्याचे जाहीर केले. पुढील १० दिवस अमेरिकेमध्ये करोनाचा वेगाने फैलाव होण्याची शक्यता असून, काही महिन्यांमध्ये बळींची संख्या एक ते दोन लाखांपर्यंत जाण्याची भीतीही व्यक्त केली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी हजारोंच्या संख्येने बेड व व्हेंटिलेटर तयार करण्याची आवश्यकता आहे. तेथील ५० राज्यांतील १००पेक्षा जास्त केंद्रांवर लष्कराच्या इंजिनीअर कोअरची पथके काम करत आहेत. नऊ हजारांपेक्षा जास्त निवृत्त लष्करी वैद्यकीय अधिकारीही सेवेत उतरले आहेत.
News English Summary: Meanwhile, the number of Corona victims worldwide has now risen to sixty thousand, and in the United States there have been fifteen hundred victims. There are 11,33,801 coronary diseases in the world, and the number of victims is 60,398. The US death toll is 7406, Spain 11,744, Italy 14,681, Germany 1275, France 6507, China 3326, Iran 3452. Even though China’s corona alliance has ended its peak, there is still a risk of a second wave. Masks are lacking in the US and Europe, and they depend on China. In New York, people are advised to wear masks. A total of 2,78,000 American people tested positive, and nine out of every ten people are locked up.
News English Title: Story corona virus over 11 lakhs corona patients worldwide 3 Lakhs American Covid19 News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार