22 November 2024 12:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अन्यथा कोरोनामुळे अमेरिकेत २ लाखांहून अधिक मृत्यू होऊ शकतातः व्हाईट हाऊस

US President White House, Corona Crisis, Covid 19

वॉशिंग्टन डीसी, ०१ एप्रिल: कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. इटली, स्पेन, अमेरिकेनंतर कोरोनामुळे फ्रान्समध्ये जास्त प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी एका दिवसात सर्वाधिक ४९९ लोकांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत फ्रान्समध्ये कोरोनामुळे ३५२३ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, गेल्या २४ तासात अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूंमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचं दिसून येतंय. गेल्या २४ तासात अमेरिकेत तब्बल ८६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनाच्या संकटात सापडलेल्या अमेरिकेसाठी पुढचे तीस दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेत सध्या १ लाख ६४ हजार निश्चित रुग्ण असून एकूण ३१०० बळी गेले आहेत. सामाजिक अंतराचा निर्बंध ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याच्या निर्णयानंतर त्यांनी सांगितले की, दोन आठवडय़ांत करोनाच्या साथीचा परमोच्च बिंदू साधला जाऊ शकतो त्यात मोठी प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील तीस दिवस अमेरिकेसमोर मोठे आव्हान आहे त्यामुळे सर्वानी सामाजिक अंतराचा निकष काटेकोरपणे पाळावा.

व्हाईट हाऊसच्या टास्क फोर्सचे सदस्य अँथनी फोसी आणि डेबोराह बिरक्स म्हणाले की, अमेरिकेत शाळा, रेस्तराँ, सिनेमा आणि सर्व हालचाली बंद करुन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सूचनांचे पालन करुनही १ लाख ते २ लाख ४० हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो.

News English Summary: Corona virus can cause up to two million deaths in the United States, two scientists who have battled the virus say. Anthony Fosey and Deborah Birks, members of the White House Task Force, said that between 1 million and 2 million 40,000 Americans can be killed in the United States, even by closing schools, restaurants, cinemas and all social movements.

 

News English Title: Story Corona virus pandemic US President white house projects 100 000 to 240 000 deaths from Corona virus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x