20 February 2025 2:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक 42 टक्क्यांनी घसरू शकतो, तज्ज्ञांचा अलर्ट, टार्गेट नोट करा - NSE: IDEA Trident Idea Share Price | ट्रायडंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TRIDENT IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा स्टॉक 52-वीक लो जवळ आला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर तेजीत, टॉप ब्रोकरेज बुलिश, मजबूत कमाईची होणार - NSE: TATAPOWER RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरमध्ये तुफान तेजी, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RVNL EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, महिना 15,000 रुपये पगार असणाऱ्यांना इतकी पेन्शन मिळेल HDFC Mutual Fund | पैसे बँकेत ठेऊन वाढत नाहीत, अशा फंडात वाढतात, 1 लाख रुपयांवर मिळेल 1.74 कोटी रुपये परतावा
x

COVID 19 Vaccine: कोरोनाची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोळ्या झाडून हत्या

Covid 19 Vaccine, Corona Virus, professor researching murder, China

न्यूयॉर्क, ७ मे : कोरोनामुळं संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वात जास्त बळी आहे. या सगळ्यात अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया प्रांतात कोरोना व्हायरसबाबत संशोधन (COVID 19 Vaccine) करणाऱ्या चीनच्याय प्राध्यपकाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. हे प्राध्यापक कोरोना विषाणूच्या सेल्युलर यंत्रणेचा शोध लावण्याच्या अगदी जवळ होते, जो या संसर्गावर उपचार करण्यास खूप उपयुक्त आहे. पेन्सिल्वेनियाची राजधानी असलेल्या पिट्सबर्गमधील रॉस शहरात ३७ वर्षीय बिंग लियू यांना त्यांच्याच घरात घुसून गोळी मारण्यात आली. लियू हे पिट्सबर्गच्या विद्यापीठातील औषध विभागात काम करत होते.

एका दाव्यानुसार, पिट्सबर्ग मेडिकल सेंटर येथे काम करणारे संशोधक डॉक्टर बिंग लिऊ यांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात खूप मोठा शोध (COVID 19 Vaccine) लावला होता. तो शोध ते जगासमोर उघडही करणार होते, पण तत्पूर्वीच त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. चीनचं नको असलेल्या गोष्टी किंवा चीनचं पितळ तो जगासमोर उघड करणार तर नव्हता ना, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

बिंग लू यांची हत्या करणाऱ्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. बिंग लू यांची हत्या केल्यानंतर या व्यक्तीने लू यांच्या घराबाहेर असलेल्या स्वत:च्याच कारमध्ये आत्महत्या केली, असा पोलिसांचा अंदाज आहे. या दोन्ही व्यक्ती एकमेकांना ओळखत होत्या, असाही पोलिसांना संशय आहे. चीनचे नागरिक असल्यामुळे बिंग लू यांची हत्या झाल्याची शक्यता तपास यंत्रणांनी फेटाळून लावली आहे.

सीएनएनच्या अहवालानुसार, लिऊच्या डोक्यावर, मान आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या होत्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर त्याच्या घरी आला तेव्हा डॉक्टरची पत्नी घरी नव्हती. पिट्सबर्ग मेडिकल सेंटर विद्यापीठाने संशोधक लिऊच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि ते म्हणाले की, तो कोरोना विषाणूबद्दलच्या एका मोठ्या शोधाच्या (COVID 19 Vaccine) जवळ आला होता आणि लवकरच त्यावर उपचार मिळणार आहे.

 

News English Summary: The whole country is in an uproar because of Corona. The corona is the most common victim in the United States. A Chinese professor doing research on the corona virus (COVID 19 vaccine) has been shot dead in the US state of Pennsylvania. This professor was very close to discovering the cellular mechanism of the corona virus, which is very useful in treating this infection. Bing Liu, 37, of Ross, Pittsburgh, the capital of Pennsylvania, was shot dead after breaking into his home. Liu was working in the Department of Medicine at the University of Pittsburgh.

News English Title: Story corona virus professor researching corona virus COVID 19 Vaccine was killed apparent murder china News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x