चीनमध्ये 'बांबू रॅट' मटणाचा १०५ अब्जांचा उद्योग, ते खातात म्हणून हंता विषाणू....सविस्तर
बीजिंग, २३ मार्च: एकाबाजूला कोरोनाने जगभर धुमाकूळ घातलेला असताना चीनमधून अजून एका नव्या व्हायरसची बातमी आल्याने लोकं पुन्हा दबावाखाली जाऊ शकतात, पण तशी धास्ती घेण्याचं अजिबात कारण नाही. यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा हंता विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. कामावरुन शाडोंग प्रांतांमधून परत येताना बसमध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मिडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
वास्तविक कोरोना व्हायरससारखा हंता व्हायरस घातक नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण हा हवेद्वारे पसरत नाही. हा व्हायरस उंदीर, खार यांच्या संपर्कात आल्यास होतो. उंदरांनी घरात आतबाहेर केल्यास हा व्हायरस पसरतो. जर कोणी निरोगी असेल आणि तो जर हंता व्हायरसच्या संपर्कात आला तर त्याला लागण होते, असे सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने म्हटले आहे. हंता व्हायरसमुळे मृत्यूची शक्यता ३८ टक्क्यांनी वाढते. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलटी, डायरिया आदी लक्षणे दिसून येतात.
वास्तविक बांबू रॅट म्हणजेच चीनमध्ये आढळणारी एकप्रकारची उंदराची प्रजाती. या उंदरांचं मांस विकून चीनमधील दुर्गम भागात राहणारे अत्यंत गरीब शेतकरी आपलं पोट भरत होते. या बांबू रॅटमुळे त्यांना चांगला नफा मिळत होता. त्यांची आर्थिक परिस्थिती हळहळू सुधारत होती, मात्र कोरोना विषाणुच्या फैलावामुळे या गरीब शेतकऱ्यांचंही जगणं अवघड झालं आहे.
चीनमध्ये ‘बांबू रॅट’ मटणाचा १०५ अब्जांचा उद्योग, ते खातात म्हणून हंता विषाणूचा त्यांना धोका ….भारतीयांनी उगाच भीती बाळगू नये.#Hantavirus pic.twitter.com/VhU19VBf9Q
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) March 24, 2020
अनेक स्थानिक सरकारनं या गरीब शेतकऱ्यांना बांबू रॅट पालनासाठी मदत केली होती. आपल्याइथे कुक्कुटपालन किंवा मत्सपालन आहे, तसेच तिथे या व्यवसायासाठी स्थानिक सरकारनं शेतकऱ्यांना अर्थसहाय्य पुरवलं होतं. मात्र आता बिजिंगमध्ये कोरोना विषाणूमुळे जंगली प्राण्यांचं मांस विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती.
चीनच्या डोंगरावर राहणारे आणि हे उंदीर पाळणारे अनेक लोक अत्यंत गरीब आहेत. त्यांच्याजवळ हे उंदीर पाळून त्यांचे मासं विकण्यापलीकडे अर्थाजनाचा दुसरा मार्ग नाही, त्यातले अनेक लोक हे दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकदेखील आहेत, अशा परस्थितीत त्यांना इतर काम मिळणं हे शक्य नाही, अशी माहिती इथल्या एका उंदीर पाळणाऱ्या व्यक्तीनं स्थानिक प्रसार माध्यमांना दिली होती.
या वर्षांच्या अखेरपर्यंत ५० दशलक्ष लोकांना दारिद्र्यरेषेखालून बाहेर काढायचं असा चीनचा उद्देश होता, मात्र कोरोना विषाणूमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेचं पूर्ण गणितच बिघडलं आहे. केवळ बांबू रॅटच्या मटणावर बंदी घातल्यानं १०५ अब्जांचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यावरुन हा व्यवसाय किती मोठा आहे याची कल्पना आपण करु शकतो. चीनच्या काही भागात तर गेल्या ३० वर्षांपासून उंदीर पाळून त्यांचे मांस विकले जात आहे. चीनच्या दक्षिण भागात उंदारांचं मांस मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. मात्र आता कोरोनामुळे चीनमध्ये त्यावर बंदी घातली आहे, त्यामुळे लाखो गरीब शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आसाम राज्यात म्हणजे भारत-भूतानच्या सीमेवर असलेल्या बकसा जिल्ह्यातील कुमारिकट्टा गावातील आदिवासी समाज अशा प्रकारे (खाली फोटो पहा) आठवडी बाजारात उंदीर विक्री करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. मात्र आजपर्यंत असं उदाहरण भारतात समोर आलेलं नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या बाबतीत चीनमधून जी सुरुवात झाली, त्याला अनुसरून कोणतीही घटना अथवा मृत्यू थेट ब्रेकिंगन्यूज’चा सपाट लावू लागल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि हंता व्हायरसच्या बाततीतील बातम्या त्यातीलच प्रकार समजावा.
News English Summery: The actual bamboo rat is a type of rat species found in China. The poorer farmers living in remote parts of China were filling their stomachs by selling the meat of these mice. With this bamboo rat they were making a good profit. Their economic conditions were gradually improving, but the spread of the corona virus has made it difficult for these poor farmers to survive. Many local governments had helped these poor farmers to maintain bamboo rat. We have poultry or fisheries, and there the local government financed the farmers for this business. But now in Beijing, the Corona virus had completely banned the sale of wild animal meat. Many of the people who live in the mountains of China and who feed these rats are very poor. “They have no other means of financing these rats and selling their fish, many of whom are also disabled or senior citizens, in which case they cannot get any other job,” a rat farmer told local media here.
News English Title: Story Corona virus pushes china poor rat meat farmers to brink of despair News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON