18 April 2025 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करणार, डिफेन्स क्षेत्रात प्रवेश, फायद्याची अपडेट - NSE: RAMASTEEL IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

डॉक्टर झाले आता चीनमधील कोरोनासंबंधित वास्तव मांडणारे तीन पत्रकार गायब

Corona Crisis, Covid19, Wuhan Corona Crisis

बीजिंग, १६ एप्रिल: अमेरिकेत कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाने अमेरिकेत सर्वात जास्त थैमान घातले आहे. कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूने गेल्या २४ तासांमध्ये २६०० नागरिकांचा बळी घेतला आहे. जो अमेरिकेत एका दिवसात मृत्यू झालेल्यांच्या आकड्यापेक्षा सर्वात जास्त आहे. तत्पूर्वी अमेरिकेतून वारंवार चीनवर आरोप करताना वूहानचा दाखला देण्यात आला होता, तसेच चीनने जगापासून मोठ्याप्रमाणावर माहिती लपविल्याचा देखील आरोप केला आहे.

दरम्यान, चीनच्या ईशान्येकडील हैलाँगजियांग प्रांतातील सुईफिन्ह शहरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. हा भाग रशियाच्या सीमेला लागून आहे. चीनमध्ये मंगळवारपर्यंत १०१२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याखेरीज मकाऊमध्ये ३९३ रुग्ण आणि तैवानमध्ये सहा जणांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची नोंद झाली, असे वृत्त चीनची सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिले आहे. सुइफिन्ह शहरात मंगळवारी ५७ नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र चीनमधून धक्कादायक माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. कारण चीनमधील वास्तव समोर आणणारे ३ पत्रकार सध्या गायब असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

चेन क्यूशी, फेंग बिंग आणि ली जहुआ या तिन्ही पत्रकारांनी यू ट्युबच्या माध्यमातून चीनमध्ये पसरत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली होती. या तिन्ही पत्रकारांनी सोशल मीडियाची प्रभावी माध्यमं असलेल्या यू ट्युब आणि ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करून चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याची माहिती जगासमोर ठेवण्याची मागणी केली होती. त्यानंतरच हे तिन्ही पत्रकार रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत.

वुहानमध्ये ज्या भागात कोरोनाच्या प्रभाव सर्वाधिक होता, त्या भागांवरून या पत्रकारांनी ग्राऊंड रिपोर्टसुद्धा केला होता. तिथली सगळी परिस्थिती या पत्रकारांना ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी चिनी सरकारकडे ही आपत्ती जगासमोर उघड करण्याची मागणी केली होती. चेन क्यूशी, फेंग बिंग आणि ली जहुआ हे तिन्ही चिनी नागरिक होते. त्यांनी कोरोना व्हायरस पसरत असलेल्या घटनास्थळी जाऊन वृत्तांकन केलं होतं. त्यांना या साथीच्या रोगाबद्दल सोशल मीडियावर वाचत्या केल्यानं शिक्षा झाल्याची आता चर्चा आहे. विशेष म्हणजे हे पत्रकार गायब असतानाही चीननं त्यांच्याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

 

News English Summary: Meanwhile, coronary diseases are increasing in Suifinh city in Hailangjiang province, northeast of China. This area borders Russia. As of Tuesday, 1012 patients had been reported in China. In addition, 393 deaths were reported in Macau and six in Taiwan due to coronation, China’s state-run Xinhua reported. 57 new patients were reported in Suifinh city on Tuesday. However, shocking information has come out of China. Concerns have been raised as to why the three journalists who brought reality to China are currently missing.

News English Title: Story corona virus three Corona virus whistle blowers remain missing two months after exposing true Wuhan Covid 19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या