14 January 2025 6:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

कोरोनवर मात करण्यासाठी संबंधित लसीची चाचणी सुरु

President Donald Trump, Corona virus vaccine trial

वॉशिंग्टन, १७ मार्च : चीनमधून आलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत ७ हजार १५८ लोकांचा जीव घेतला आहे. तर १.८० लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. परिस्थितीची तीव्रता पाहता डब्ल्यूएचओने कोरोनाला महामारी (साथीचा रोग) जाहीर केला आहे. अमेरिकेतही कोरोना विषाणूमुळे ६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीची मानवावर चाचणी घेण्यास अमेरिकेतील सिएटलमध्ये सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली. अर्थात ही लस सर्वसामान्यांसाठी बाजारात यायला आणखी दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. वेगवेगळ्या चाचण्यामध्ये यशस्वी ठरल्यानंतर आणि आवश्यक मान्यता मिळाल्यानंतरच ही लस बाजारात उपलब्ध होईल.

या लसीचे नाव mRNA-1273 असे असून अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ती विकसित केली आहे. जैवतंत्रज्ञानातील अमेरिकी कंपनी मॉडर्ना यांचेही सहकार्य ही लस तयार करण्यासाठी घेण्यात येत आहे.

जर्मनीतील कंपनीने लशीबाबत केलेल्या संशोधनाचे हक्क विकत घेऊन अमेरिकेने लस तयार करण्याचे प्रयत्न चालवले आहेत, असे एक वृत्त जर्मनीतील वृत्तपत्रात आले आहे. जर्मनीचे अर्थमंत्री पीटर अल्टामियर यांनी सांगितले की, ‘‘आम्ही लशीचे संशोधन विकायला बसलेलो नाही, जर्मनी विकाऊ नाही.’’ ट्रम्प हे लशीच्या संशोधनाचे अधिकार विकत घेऊन लस तयार करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची बातमी वेल्टॅम सोनॅटॅग या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. ट्रम्प यांनी लशीच्या संशोधनाची माहिती केवळ अमेरिकेला मिळावी यासाठी लाखो डॉलर्स देऊ केले आहेत. अमेरिकी अधिकाऱ्यांनी यावर सांगितले की आम्ही अनेक कंपन्यांना लशीसाठी बीड भांडवल दिले आहे, पण आता जी बातमी आली आहे ती अतिरंजित आहे.

 

News English Summery: Good news for those who are ready to fight the Corona virus. The Corona Anti-Vaccine Vaccine is being launched in Seattle, USA, to test humans. Officials at the U.S. Department of Health reported this. Of course, it may take another two-and-a-half years for the vaccine to become available to the public. The vaccine will be available on the market only after successful testing and obtaining the necessary approval. The vaccine is named mRNA-1273 and was developed by scientists at the National Institutes of Health in the United States. The US-based biotechnology company Moderna is also collaborating to produce the vaccine.

 

News English Title: Story Corona virus vaccine trial start in America President Donald Trump tweeted News Latest updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x