18 April 2025 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार
x

चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिकेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु

Corona Crisis, Covid 19, Mike Pompeo

वॉशिंग्टन, २५ एप्रिल:  अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला असून, या भयावह आजाराने आतापर्यंत ५० हजार ३१६ जणांचा बळी घेतला आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे १५ हजार ७४० मृत्यू एकट्या न्यूयॉर्कमधील आहेत. न्यूयॉर्कखेरीज न्यू जर्सी, मिशिगन, मॅसेच्युएट्स आणि कॅलिफोर्निया या शहरांत आणि प्रांतांमध्येही कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू यांची संख्या वाढत चालली आहे. या पाच ठिकाणी मिळून आतापर्यंत सुमारे ३० हजार लोक मरण पावले आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या मुद्यावरुन चीनची कोंडी करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने मोर्चबांधणी सुरु केली आहे. अमेरिका यासंदर्भात इतर राष्ट्रांना आपल्या बाजून वळवण्याचे प्रयत्न करत आहे. माइक पोम्पियो म्हणाले की, कोरोना विषाणूच्या मुद्यावर दुसऱ्या राष्ट्रांशी चर्चा सुरु आहे. या विषाणूची उत्पती ही चीनच्या वुहान शहरात झाली हे आम्ही इतर राष्ट्रांना सांगत आहोत. विषाणूसंदर्भात निर्माण होणाऱ्या उकल ही चीनने सर्वांसमोर करायला हवी.

ते पुढे म्हणाले, डिसेंबर २०१९ मध्येच चीनमध्ये या विषाणूची पुष्टी झाली. चीनमधून देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने अमेरिकेत थैमान घातले असून याठिकाणी मृतांचा आकडा वाढत असून अर्थकारणावरही याचे विपरित परिणाम जाणवत आहेत. जगभरात घोंगावत असलेल्या संकटाला चीन जबाबदार आहे, असेही ते म्हणाले.

दुसऱ्या बाजूला करोना साथीच्या काळात अमेरिकी काँग्रेसने सुमारे ५०० अब्ज डॉलरची मदत जारी केली आहे. अडचणीत सापडेल्या कंपन्या, रुग्णालये यांना दिलासा देण्यासाठी ही मदत देण्यात येत आहे. करोना प्रादुर्भावामुळे अमेरिकेत सुमारे ५० हजार जणांचा मृत्यू झाला असून, दर सहा पैकी एकाची नोकरी गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर मदतीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

 

News English Summary: The United States has launched a crackdown on China over the Corona virus. The US is trying to sway other nations in this regard. Mike Pompeo said discussions are underway with other nations on the issue of the corona virus. We are telling other nations that the virus originated in Wuhan, China. China should make the solution to the virus public.

News English Title: Story Covid 19 outbreak US will make sure other countries know that coronav irus originated in China says Mike Pompeo.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या