17 April 2025 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

अमेरिका एक-एक नागरिकाच्या मृत्यूचा बदला घेणार? ट्रम्प यांची चीनला धमकी

Covid 19, Corona Crisis, US President Donald Trump

वॉशिंग्टन, १९ एप्रिल: कोरोना व्हायरसप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनना खुले आव्हान दिले आहे. कोरोना जाणिपूर्वक पसरवला असेल चर चीनला याचे परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प म्हणाले आहेत. शनिवारी पत्रकारांशी बोलताना हे विधान केले. जर ही चूक असेल तर चूक ही चूक असते. पण कोरोना जर जाणिवपूर्वक पसरवला असेल तर चीनला याचे परिणाम भोगावे लागतील.

शनिवारी व्हाईट हाऊस येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जर ते (चीन) जाणूनबुजून हा विषाणू पसरवण्यास जबाबदार असल्याचे समोर आले तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. १९१७ नंतर कोणीच इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचे पाहिलेले नाही, असे ते म्हणाले. त्यांनी म्हटले की, कोविड-१९ जगभरात पसरण्यापूर्वी चीनबरोबर आमचे संबंध चांगले होते. परंतु, या प्रकारामुळे आता खूप फरक पडला आहे. चीनवर आपण नाराजही असल्याचे त्यांनी सांगितले.

वुहानमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे आकडे समोर आणले. यानंतर चीनवर जगभरातून टीका होत आहे. चीनने जाहीर केलेले मृतांचे आकडे पारदर्शक नसल्याचे सांगत ट्रम्प आणि त्यांचे ज्येष्ठ सहकाऱ्यांनी टीका केली. चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्युच्या संख्येवर देखील ट्रम्प यांनी शंका घेतली.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे प्रत्येकाचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत जगात सर्वांत मोठी आमची अर्थव्यवस्था होती. चीन आमच्या आसपासही नव्हता, हे सांगताना ते पुढे म्हणाले की, इराण आधीपेक्षा एक अत्यंत वेगळा देश झाला आहे. पूर्वी इराण पश्चिम आशियावर आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत होता. आता तो फक्त जगू इच्छितो, अशा शब्दांत अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिला.

 

News English Summary: US President Donald Trump has issued an open challenge to China over the Corona virus. Trump has said China will suffer the consequences if the corona is intentionally spread. Making this statement while talking to reporters on Saturday. If this is a mistake, then the mistake is a mistake. But if Corona were consciously dispersed, then China would suffer the consequences.

News English Title: Story Covid 19 US President Donald Trump warns China could face consequences for Corona virus outbreak News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या