22 November 2024 7:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

जगभरात कोरोनाबळींची संख्या दोन लाखांवर

Covid 19, Corona Crisis

वॉशिंग्टन, २६ एप्रिल: कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी दोन तृतीयांश नागरिकांचा मृत्यू एकट्या युरोपमध्ये झाला आहे. तर एक चतुर्तांश नागरिकांचा मृत्यू अमेरिकेत झाला आहे. तर अमेरिकेत कोरोनाचे एक तृतीअंश रुग्ण आढळले आहेत.

या विषाणूमुळे जगभरातील २,०३,२७२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर २९ लाखांपेक्षा जास्त लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये अमेरिकेत आतापर्यंत सर्वात जास्त ५३,५११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर या विषाणूची लागण झालेले ८,३६,५११ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

कोविड १९ म्हणजे करोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेत औषधे व लशी मिळून एकूण ७२ घटकांवर चाचण्या सुरू असून २११ घटक हे कोविड १९ उपचारातील नियोजन पातळीवर आहेत, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, भारतातील विविध राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय.आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात करोना व्हायरसबाधित रुग्णांची संख्या २६ हजार ४९६ वर पोहचलीय. यातील ५८०४ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. तर करोनाला बळी पडणाऱ्यांची संख्या ८२४ वर पोहचलीय.

 

News English Summary: The corona virus has spread worldwide. The virus has so far killed more than two lakh people. Europe alone accounts for two-thirds of all corona deaths worldwide. A quarter of Americans have died. In the United States, one-third of coronaviruses are found.

News English Title: Story global covid 19 death toll passes 200000 us corona virus cases News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x