18 January 2025 4:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

इटलीमध्ये कोरोनाचा तांडव; २४ तासांत १००० जणांचा मृत्यू

Covid 19 Death, Corona Crisis, Italy

रोम, २८ मार्च: जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. करोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत १९५ देशांत पसरला असून पाच लाख नागरिकांना याची लागण झाली आहे. २६ हजारांपेक्षा आधिक नागरिकांचा या महामारीनं बळी घेतला आहे. चीनच्या वुहान या शहरातून उद्भवलेल्या या कोरोना विषाणूने इटलीत हाहाकार माजवला आहे. इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे.

कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या इटलीमध्ये मृत्यूचं अक्षरश: तांडव सुरु आहे. शुक्रवारी एका दिवसांत मृतांचा आकडा जवळपास हजाराला टेकला. एएफपीच्या वृत्तानुसार, इटलीत मागील २४ तासांत कोरोना विषाणूने तब्बल ९६९ जणांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत एका दिवसातील हा मृतांचा सर्वाधिक आकडा आहे. यापूर्वी इटलीत २१ मार्चला सर्वाधिक ७९३ लोकांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. कोरोना विषाणूची लागण झालेला आकड्या ८० हजार पेक्षा अधिक असून यातील ८ हजारहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी इटलीमध्ये मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत एकाच दिवसात ९७० लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे युरोपियन देशात मृतांचा आकडा ९१३४ वर गेला आहे. तसेच ८६,४९८ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर केवळ १०,९५० लोक बरे झाले आहेत. या आठवड्यात दोनदा आकडेवारी कमी झाल्याने देशातील वैद्यकीय कर्मचारी काहीसे निश्चिंत आहेत, पण पुन्हा एकदा परिस्थिती विदारक बनली आहे. तथापि, संसर्गाचे प्रमाण मागील ८% वरून ७.४% पर्यंत खाली आले आहे.

 

News English Summary: Coronary outbreaks are increasing worldwide and the number of patients and deaths is increasing. The Corona virus infection has spread to 195 countries so far and over five million people have been infected. The epidemic has killed more than 26,000 citizens. This corona virus originating in Wuhan, China, has caused outbreaks in Italy. Italy has the highest number of deaths than China. Italy is virtually on the verge of death, with the Corona virus discovered. On Friday, the death toll dropped to nearly a thousand. According to AFP, the Corona virus has killed 969 people in Italy in the past 24 hours. This is the highest number of deaths in a single day so far. Earlier in Italy, on March 21, the highest number of 793 people died in the same day. The number infected by the corona virus is more than 80,000 and more than 8,000 people have lost their lives.

 

News English Title: Story Italy records almost 1000 Covid19 related records deaths highest in a day News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x