18 January 2025 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

भारतात पिझ्झाबॉय'नंतर सिंगापूरमध्ये मॅकडॉनल्ड्सचे ७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Covid 19, Corona Crisis, Mc Donald

सिंगापुर, २० एप्रिल: दोन दिवसांपूर्वी भारतातील दिल्लीत एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्यानंतर लोकांमध्ये खाण्या-पिण्याचं सामान ऑर्डर करताना भीतीचं वातावरण आहे, कारण त्यांने तब्बल ७२ ऑर्डर घरपोच दिल्या होत्या. अशातच आता बहुराष्ट्रीय कंपनी मॅकडॉनल्ड्सच्या सात कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. ही घटना सिंगापूरमधील आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कंपनीने काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवलं आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मॅकडॉनल्डद्वारा काम बंद करण्याचा निर्णय ड्राईव्ह थ्रू (वाहनावरुन न उतरता ऑर्डर देण्याची सुविधा) आणि वितरणासाठीही घेण्यात आला आहे. कंपनीने त्यांची टेकअवे सेवा शनिवारपासून थांबवली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार कंपनीने आपल्या रेस्टॉरंट्स, डिलिव्हरी आणि ड्राईव्ह थ्रू ऑपरेशन्स 4 मेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचं कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

कंपनीचे सिंगापूरचे व्यवस्थापकीय संचालक केनेथ चान यांनी सांगितलं की, ‘हा काळ आपल्या सर्वांसाठीच अतिशय कठीण आहे. आम्ही आमच्या ग्राहक आणि कर्मचार्‍यांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी शक्य तितक्या खबरदारीची पावलं उचलली आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरु ठेवू’

दुसरीकडे भारतामध्ये तेलंगणात लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याव्यतिरिक्त सरकारनं झोमॅटोस स्विगी आणि पिझ्झा घरपोच पोहोचवण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जर आपण पिझ्झा घेतला नाही तर आपल्याला काही होणार नाही, असं या नंतर मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं. यानंतर ५ मे रोजी परिस्थितीत पाहून मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं.

 

News English Summary: According to PTI news agency, McDonald’s decision to close the work has also been taken for drive-through (non-delivery order) and delivery. The company has stopped its takeaway service from Saturday. The company has decided to postpone its restaurants, delivery and drive-through operations by May 4, according to the Health Ministry advice.

News English Title: Story Mc Donalds seven employees corona positive Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x