16 April 2025 7:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON
x

ह्रदयशस्त्रक्रियेनंतर उ. कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याची प्रकृती गंभीर

Story South Korea, North Korea, Kim Jong Uns, Heart surgery, CNN News

वॉशिंग्टन, २१ एप्रिल: उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा हुकूमशहा किम जोंग उन हे गंभीर असल्याचे वृत्त काही अमेरिकी माध्यमांनी दिले आहे. दक्षिण कोरियाकडून या संदर्भातील वृत्तांची माहिती घेण्यात येत आहे. या वृत्ताला अधिकृतपणे कोणताही दुजोरा मिळालेला नाही. काही अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची तब्येत खालावली. काही माध्यमांनी त्यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात आल्याचे म्हटले आहे. पण त्यालाही दुजोरा मिळालेला नाही.

अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था उत्तर कोरियातील घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, किम यांची प्रकृती मागील काही महिन्यांपासून ठिक नव्हती. लठ्ठपणाचा त्यांना त्रास होता. त्याशिवाय अति धुम्रपानाच्या आहारी ते गेले होते. किम हे ११ एप्रिल रोजी दिसले होते. इतकंच नव्हे किम यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे दिवंगत नेते किम उल संग यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या १५ एप्रिलच्या कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती होती. किम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.

तसंच त्यांच्या ब्रेन डेड झाल्याच्या चर्चांववर अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर उत्तर कोरियातून कोणतीही योग्य माहिती मिळणं अवघड असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आपल्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते सहभागी झाले नव्हते यावरून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

दक्षिण आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंधाचा विषय हाताळणाऱ्या दक्षिण कोरियातील मंत्रालयाने अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, डेली एनके या माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांची तब्येत आता सुधारत आहे. त्यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात आली. पण आता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.

 

News English Summary: North Korea’s dictator Kim Jong Un is reportedly serious by some US media. Reports in this regard are being sought from South Korea. This report has not officially received any confirmation. According to some US media reports, Kim Jong Un is in critical condition. His health deteriorated after he underwent surgery. Some media have reported that he had a cardiac arrest.

News English Title: Story South Korea looking into reports of North Korean leader Kim Jong Uns fragile week condition after surgery News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#North Korea(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या