22 November 2024 12:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

साथीचे रोग रोखण्यासाठी UN'मध्ये वन्यजीव बाजारपेठेवर जागतिक बंदीची मागणी

Covid19, Corona Crisis, China Wild Animals Market

वुहान, ८ एप्रिल : चीनमधले वुहान शहर म्हणजे कोरोनाचे केंद्रस्थान झाले होते. तब्बल ३ महिने वुहान शहर कोरोनाशी दोनहात करत होता. वुहान हे कोरोनाचे केंद्र आहे आणि या शहरात या विषाणूमुळे तब्बल ३३०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वुहानमध्ये ८२ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली. ताज्या सरकारी आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या काही आठवड्यांत शहरातील कोरोनाची प्रकरणे झपाट्याने कमी झाली आहेत. मंगळवारी (७ एप्रिल) रोजी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत कोरोनाचे एकही प्रकरण समोर आले नाही. त्यामुळेच सरकारने लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

८ जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) वुहान या चीनमधील शहरात न्यूमोनियाच्या काही केसेस आढळल्या होत्या, ज्यामध्ये श्वसनयंत्रणेवर ताण पडतो. डिसेंबरमध्ये ५९ जणांना हा आजार झाल्याचे जाहीर करण्यात आले. वुहान बाजारात प्राण्यांचं मांस विकणाऱ्या अनेक विक्रेत्यांना या आजारानं ग्रासल्याचं समोर आलं.

मात्र चीनच्या वुहान शहरातील वन्यजीव मांसाची बाजारपेठे हीच कोरोनाचं उगम स्थान असल्याचे समोर आल्याने संयुक्त राष्ट्राचे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचे कार्यकारी सचिव एलिझाबेथ मारुमा क्रेमा यांनी बंदीची मागणी केली आहे. अशा वन्यजीव बाजारपेठेंवर जागतिक बंदी घालून भविष्यातील साथीच्या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे.

विशेष म्हणजे चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक होताच चीनच्या सरकारने प्रथम वन्यजीव बाजारांवर बंदी घातली होती हाच यातील मोठा पुरावा असल्याचं जगाच्या समोर आलं होतं. मात्र मागील आठवड्यात आलेल्या वृत्तानुसार चीनने देशातील कोरोनाव्हायरसचा प्रभाव कमी होताच पुन्हा या वन्यजीवांच्या बाजापेठा सुरु केल्या आहेत. चीनच्या या बाजारात, पिंजरामध्ये सिव्हेट, कुत्रे, वटवाघळं, साप, उंदीर, कोल्ह्यांची पिल्लं, पॅंगोलिन आणि अनेक प्रकारच्या प्राण्यांना जिवंत ठेवले जाते, आणि ग्राहकाला निवडीप्रमाणे त्यांचं मांस विकलं जातं. जे तज्ञांच्या मते नंतर त्या प्राण्यांमधील रोग (विषाणू) नंतर मानवांमध्ये संक्रमित करतात. विशेष म्हणजे अनेक वैज्ञानिकांनी चीनला आपले वन्यजीव बाजार कायमचे बंद करण्याचे आवाहन केले आहे.

चीन जैवविविधता संवर्धन आणि ग्रीन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सरचिटणीस, जिनफेंग झोऊ यांनी देखील कम्युनिस्ट सरकारला देशातील वन्यजीव बाजारांवर कायमची बंदी घालण्याचे आवाहन केले. झोऊ पत्रकारांशी बोलताना म्हणाले की वन्यजीव बाजारांवर बंदी घालण्यामुळे मनुष्यावर रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून वाचवता येईल आणि प्राण्यांचे ही संरक्षण होईल.कोरोना हा विषाणू चीनच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून आला आहे. तेच कोरोनाचं उगम स्थान असून येथूनच मोठ्या आणि अवैद्यप्रकारे जनावरांचा व्यापार केला जातो.

 

News English Summary: Elizabeth Maruma Mrema, the acting executive secretary of the UN Convention on Biological Diversity has called on the global community to put a blanket ban on wildlife markets operating in countries such as the one in China’s Wuhan city, which is believed to be the origin of corona virus outbreak. Elizabeth said that countries should work on preventing future pandemics by banning ‘wet markets’ or ‘wildlife markets’ that are believed to be the major cause behind disease outbreaks.

News English Title: Story United Nations calls for global ban on wildlife markets to prevent future pandemic Covid19 Corona Crisis News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x