5 November 2024 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

जागतिक आरोग्य संघटनेचं चीनकडे जास्तच लक्ष; तुमचा निधी रोखू; धमकीसत्र सुरूच

Covid19, Corona Crisis, US Presindent Donald Trump, World Health Organization

वॉशिंग्टन, ०८ एप्रिल: जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. कोरोनामुळे अमेरिकेतील परिस्थिती सुद्धा दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांता दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर (WHO) गंभीर आरोप केले आहेत. जागतिक आरोग्य संघटना चीनकडे जास्त लक्ष केंद्रीत करत असल्याचा आरोप आहे. अमेरिकडून जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारा निधी रोखण्यात येणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

व्हाईट हाऊसमध्ये मंगळवारी पत्रकारांशी नैमित्तिक संवादावेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आम्ही जागतिक आरोग्य संघटनेला निधी देणार नाही. अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी रोखला जाईल. मात्र त्याच पत्रकार परिषदेत काही मिनिटात ट्रम्प म्हणाले की, “मी असे करणार, हे मी म्हटलेले नाही. निधी पुरवठा बंद करण्यााच विचार करु असे मला म्हणायचे आहे.”

जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक निधी अमेरिकेकडून दिला जातो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने सर्वात आधी अमेरिकेचा विचार केलाच पाहिजे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी अनेकवेळा म्हटले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचा नक्की किती निधी रोखणार याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी सांगितले की, मी नुसता बोलत नाही. तर करून दाखवतो. लवकरच मी निधी रोखणार आहे.

ट्रम्प यांनी देखील वेळीच उपायोजना न केल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा मोठया प्रमाणावर टीका सुरु आहे. आधी त्यांनी अमेरिकेत परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला होता. नंतर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. Covid-19 मुळे अमेरिकेत १२ हजार पेक्षा जास्त नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 

News English Summary: The worldwide outbreak of corona virus is shocking. The situation in the United States is also getting worse with Corona. Two thousand people have died in the United States in the last 3 hours. In the meantime, US President Donald Trump has made serious accusations against the World Health Organization (WHO). The World Health Organization is alleged to be focusing more on China. Donald Trump has said that funding from the US to the World Health Organization will be withheld.

News English Title: Story US President Donald Trump accuses World Health Organization of bias toward China threatens to put hold on US Funding Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x