5 November 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख
x

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संतापले; कोरोना आपत्तीत डब्ल्यूएचओचा निधी रोखला

WHO, Corona Crisis, Covid19, US President Trump

वॉशिंग्टन, १५ एप्रिल: अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) देण्यात येणारा निधी रोखण्याचे निर्देश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनाला दिले आहेत. डब्ल्यूएचओने कोविड-१९ बाबत चुकीचे व्यवस्थापन केले आणि त्याची माहिती लपवल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. मंगळवारी व्हाईट हाऊस येथे आयोजित नियमित पत्रकार परिषदेत त्यांनी डब्ल्यूएचओचा निधी रोखण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर कोविड-१९ बाबतच्या डब्ल्यूएचओच्या भूमिकेचे समीक्षण केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.

डब्ल्यूएचओला निधी देणाऱ्या देशांत अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. अमेरिकेकडून डब्ल्यूएचओला सर्वाधिक मदत मिळत होती. त्यामुळे अमेरिकेने निधी रोखण्याचा घेतलेला निर्णय फार मोठा असून याचे दूरगामी परिणाम होतील, असे बोलले जात आहे. ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओवर चुकीची माहिती दिल्याचा आणि चीनने दिलेल्या माहितीवरच अवलंबून राहिल्याचाही आरोप केला आहे. तसेच यामुळेच कोरोना जागतिक पातळीवर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचेही म्हटले आहे.कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत सर्वाधिक म्हणजेच २६,०४७ जणांचा मृत्यू झाला. तर तब्बल ६१३,८८६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेच्या या निर्णयावर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, डब्ल्यूएचओचा निधी रोखण्याची ही योग्य वेळ नाही. ही वेळ आता कोरोना विषाणूविरोधात लढण्याची आहे. या विषाणूविरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकजूट होण्याची ही वेळ आहे, असेही ते म्हणाले.

अमेरिका डब्ल्यूएचओला दरवर्षी चार ते पाच हजार डॉलरची आर्थिक मदत देत असते, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. डब्ल्यूएचओने चीनमध्ये वास्तविक स्थितीचे आकलन करण्यासाठी तसेच तज्ज्ञ उपलब्ध करुन देण्यासाठी आणि पारदर्शकतेतील अभाव कमी करण्यासाठी काम केले होते का ? त्यांनी जर तसे केले असते तर याचा प्रकोप खूप कमी झाला असता आणि निश्चितरित्या मृत्यूही कमी झाले असते. हजारो लोकांचा मृत्यू आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान टाळता आले असते.

 

News English Summary: President Donald Trump has directed the administration to withhold funding from the United States to the World Health Organization (WHO). Trump has accused the WHO of mismanaging Covid-19 and hiding its information. At a regular press conference held at the White House on Tuesday, he said he had instructed the WHO to withhold funding. He also said that the role of WHO on Covid-19 would be reviewed.

News English Title: Story US President Donald Trump cuts WHO funding over Corona virus outbreak Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x