सोयीनुसार राजकीय मैत्री आणि राष्ट्रीय गरजेनुसार धमकी; अनोखी आंतरराष्ट्रीय मैत्री
वॉशिंग्टन, ०८ एप्रिल : कोरोनाच्या संकटाने महासत्ता असलेल्या अमेरिकेचे सध्या कंबरडे मोडले आहे. यासाठीच अमेरिकेने भारताकडे मदत मागितली होती. ही मदत मागितल्यानंतर २४ तासांच्या आत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला धमकीही दिली होती. आता त्याच पंतप्रधान नरेंद मोदींचं कौतुक ट्रम्प यांनी केलं आहे. भारताने अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध देण्याची तयारी दर्शवल्यानंतर ट्रम्प यांनी मोदी महान असल्याचे मत व्यक्त केलं आहे.
“करोना व्हायरसवर उपचारासाठी मी लाखो डोस खरेदी केले आहेत. दोन कोटी ९० लाखापेक्षा जास्त डोस खरेदी केले आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. भारतातून भरपूर औषधे येणार आहेत. तुम्ही निर्बंध हटवू शकता का? असे मी मोदींना विचारले. ते महान आहेत. ते खूपच चांगले आहेत. भारतासाठी औषधांची आवश्यकता असल्याने त्यांनी हे निर्बंध घातले होते” असे ट्रम्प म्हणाले.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि पॅरासिटामॉल या दोन्ही औषधांच्या निर्यातीवरील बंदी भारताने अंशतः मागे घेतली आहे. भारतीय गरजेचा विचार करून ज्या देशांनी आधीच या औषधांची मागणी केली होती. त्यांना ती देण्याचा विचार केला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आधीच्या विधानात बदल केला आहे.
News English Summary: The coronary crisis has broken America’s backbone. That is why the United States sought help from India. Within 24 hours of seeking this help, US President Donald Trump had even threatened the Modi government. Trump has now praised the Prime Minister Narendra Modi. Trump has said Modi is great when India prepares to give US hydroxychloroquine drug.
News English Title: Story US President Donald Trump praise PM Narendra Modi after India export of Hydroxychloroquine Covid19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH