या वर्षाअखेरीस कोरोना व्हायरसवर नक्कीच लस मिळेल - डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन, ४ एप्रिल : कोरोनामुळं अमेरिकेत हाहाकार माजला असताना गेल्या काही दिवसांपासून येथील मृत्यूदर कमी झाला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, कोरोनाव्हायरसची लस तयार करण्याचे काम जोरात सुरू असून, या वर्षाअखेरीस नक्कीच लस मिळेल. दरम्यान, अमेरिकेतील काही राज्यांमध्ये बाजार आणि दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मात्र सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक असणार आहे. ट्रम्प यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, कोरोनाचा वाईट काळ टळून गेला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा आपल्या पायावर उभी राहिल, अशी वेळ आता आली आहे.
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये १८ हजारांवर मृत्यू झाले आहेत. गेले काही दिवस अमेरिकेत रोज हजारांवर बळी जात आहेत. तर न्यूजर्सीमध्ये साडेसात हजारावर बळी जात आहेत. मात्र चीनवरील आरोपांचे सत्र अमेरिकेत असून सुरूच आहेत. चीनने एका विशिष्ट उद्देशानं हा व्हायरस तयार केल्याचाही आरोप होतो आहे.
आता कोरोना व्हायरसची माहिती लपवण्यामागे अमेरिकेनं नवा खुलासा केला आहे. कोरोनाचं किती मोठ्या प्रमाणात संक्रमण झालं हे पाहण्यासाठीच चीननं माहिती लपवून ठेवली आहे. जेणेकरून ते इतर देशांना निर्यात करत असलेला वैद्यकीय पुरवठा वाढवू शकतील असा नवा आरोप करण्यात आला आहे.
News English Summary: The death toll in the United States has risen sharply in recent days as the Corona has caused a famine in the United States. In such a scenario, US President Donald Trump has claimed that work on a corona virus vaccine is in full swing and that the vaccine will be available by the end of this year. Meanwhile, markets and shops have been allowed to open in some US states.
News English Title: Story US President Donald Trump said US will create corona virus covid 19 vaccine by end of this year News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल