18 January 2025 8:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत बळींचा आकडा वाढणार

Donald Trump, Corona Crisis, Covid 19

वॉशिंग्टन, ४ एप्रिल : कोरोनामुळं अमेरिकेत हाहाकार माजला असताना गेल्या काही दिवसांपासून येथील मृत्यूदर कमी झाला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, कोरोनाव्हायरसची लस तयार करण्याचे काम जोरात सुरू असून, या वर्षाअखेरीस नक्कीच लस मिळेल. दरम्यान, अमेरिकेतील काही राज्यांमध्ये बाजार आणि दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक असणार आहे. ट्रम्प यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, कोरोनाचा वाईट काळ टळून गेला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा आपल्या पायावर उभी राहिल, अशी वेळ आता आली आहे.

दुसरीकडे अमेरिकेत कोरोनाचे संकट दिवसेदिवस अधिकच वाढत आहे. अमेरिकेतील मृतांची संख्या आताच ६८ हजाराच्या वर गेली आहे. तर ११ लाख ८० हजारांवर कोरोनाचे रुग्ण आहेत. अमेरिकेतील कोरोनाचा हा कहर एवढ्यावरच थांबेल असे वाटत नाही. कोरोनामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होईल, असा अंदाज खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये १८ हजारांवर मृत्यू झाले आहेत. गेले काही दिवस अमेरिकेत रोज हजारांवर बळी जात आहेत. तर न्यूजर्सीमध्ये साडेसात हजारावर बळी जात आहेत. मात्र चीनवरील आरोपांचे सत्र अमेरिकेत असून सुरूच आहेत. चीनने एका विशिष्ट उद्देशानं हा व्हायरस तयार केल्याचाही आरोप होतो आहे. आता कोरोना व्हायरसची माहिती लपवण्यामागे अमेरिकेनं नवा खुलासा केला आहे. कोरोनाचं किती मोठ्या प्रमाणात संक्रमण झालं हे पाहण्यासाठीच चीननं माहिती लपवून ठेवली आहे. जेणेकरून ते इतर देशांना निर्यात करत असलेला वैद्यकीय पुरवठा वाढवू शकतील असा नवा आरोप करण्यात आला आहे.

 

News English Summary: The corona crisis in the United States is growing by the day. The death toll in the United States has now risen to 68,000. There are 11 lakh 80 thousand corona patients. I don’t think the Corona disaster in the United States will stop there. Corona is estimated to have killed more than a million people, according to US President Donald Trump himself.

News English Title: Story US President Donald Trump says up to 1 lakh Americans may die from corona virus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x