16 January 2025 12:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

उपासमारीमुळे जगभर १३.५० ते २५ कोटी लोक उपाशीपोटीच मरण्याची शक्यता - WFP प्रमुख

Covid 19, Corona crisis

वॉशिंग्टन , २२ एप्रिल: कोरोना व्हायरसने जगभरात थैमान पसरलं आहे. कोरोनामुळे जगभरात जवळपास १ लाख ७० हजारांहून अनेक मृत्यू झाले आहेत. जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या २४ लाख ८३ हजार ८६ इतकी झाली आहे. ही संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. एएफपीने ही आकडेवारी राष्ट्रीय अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसमुळे मोठमोठे देश अर्थाइक संकटात सापडले आहेत. जगभरात बेरोजगारीची मोठी लाठ येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून अनेक देशांमध्ये त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता याआधीच वर्तविण्यात आली आहे. मात्र विषय एवढ्यावरच थांबणार नसून संपूर्ण जगाचे अर्थचक्र थांबल्याने इतर अनेक संकटं डोकं वर काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जगातील अनेक देशांमध्ये अन्नपाण्याची प्रचंड टंचाई भासणार आहे. यामुळे अख्ख्या जगासमोर उपासमारीचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर मोठ्या दुष्काळाचाही सामना करावा लागणार आहे. हा इशारा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक खाद्य योजनेच्या (WFP) प्रमुखांनी दिला आहे. WFP चे प्रमुख डेविड बेस्ले यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे १३.५० ते २५ कोटी लोक उपाशीपोटीच मरण्याची शक्यता आहे. जगाला उद्धवस्त होण्य़ापासून वाचविण्यासाठी सर्व देशांना एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.

भूकबळींचा धोका येमेन, कांगो, अफगाणिस्तान, व्हेनेझुएला, इथिओपिया, दक्षिण सुदान, सिरिया, नायजेरिया या देशांना अधिक असणार आहे. हे देश युद्ध, आर्थिक संकट आणि जलवायू परिवर्तनासारख्या संकटांना तोंड देत आहेत. डेविड बेस्ले यांनी हा इशारा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये दिला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बोलत होते.

 

News English Summary: In many countries of the world, there will be severe food shortages. This is likely to cause a major hunger strike in front of the whole world. It will also face a major drought. The warning was issued by the head of the United Nations World Food Program (WFP). WFP chief David Beasley said the corona virus could starve between 13.50 million and 25 million people. All nations need to work together to save the world from collapse.

News English Title: Story verge hunger pandemic caused corona virus united nations warning Covid19 News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x