सगळं जग लॉकडाउन अन चीनमध्ये शाळा-कॉलेजेस सुरू
बीजिंग, २७ एप्रिल: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध देशांमध्ये लागू करण्यात आलेले लॉकडाउन आता शिथिल करण्यात येत आहेत. मात्र, कोरोनाचा फैलाव पुन्हा डोके वर काढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे व्यवसाय पुन्हा सुरू करण्याआधी व्यावसायिकांकडून सावधानता पाळण्यात येत आहे.
जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाउन केले होते. चार-पाच आठवड्यांपासून सुरू असणारे लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. अमेरिकेतील जॉर्जिया, ओक्लाहामा आणि अलास्का या राज्यांमधील व्यवसाय सुरू करण्यात येत आहेत. मात्र, हे निर्बंध वेळेआधी शिथिल करण्यात येत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कोव्हिड-१९चा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमधील रूग्णालयात दाखल झाला आणि तिथून कोरोना साथीचा हा आजार अवघ्या जगभरात पसरला. वृत्तसंस्था पीटीआयने, चीनची अधिकृत न्यूज एजन्सी शिन्हुआच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, वुहानमध्ये कोव्हिड-१९चा आता एकही रुग्ण शिल्लक नाही. ७६ दिवस म्हणजेच किमान अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर अखेर ८ एप्रिलला वुहानमध्ये लॉकडाऊन उघडण्यात आलं.
त्यानंतर हा आजार सर्व जगभर पसरला. आज १८५ पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. जगभरातल्या जवळपास ३० लाख लोकांना कोरोनाने ग्रासलं असून २ लाख लोकांचा मृत्यू झालाय. चीनच्या भूमिकेमुळेच हा आजार जगभर पसरल्याचा आरोप होत आहे. चीनमध्ये मात्र आता सगळे व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून असलेली बंधनं हळू हळू दूर करण्यात येत आहेत.
राजधानी बीजिंग आणि शांघाय सारख्या मोठ्या शहरांमध्ये काही शाळा आणि कॉलेजेस सुरू झाले आहेत. दुकानं आणि वाहतुकीलाही सुट देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून कोरोनाचे तुरळक रुग्ण सापडत आहे. जानेवारी महिन्यातच चीनमध्ये कोरोनाला सुरुवात झाली होती. त्यानंतर चीनने अतिशय कठोर निर्णय घेत लॉकडाऊन केलं. अनेक बंधणं लादली आणि कोरोनाला प्रसार रोखला.
News English Summary: Some schools and colleges have started in big cities like the capital Beijing and Shanghai. Shops and transportation are also exempted. The number of corona patients has also decreased and fewer corona patients are being found. Corona was launched in China in January. China then took a very tough decision and locked it down. Imposed several restrictions and prevented the corona from spreading.
News English Title: Story whole world is in Lockdown but China opens schools and collages News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH