15 January 2025 8:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

WHO कोणत्या धुंदीत? बरे होणाऱ्या रुग्णांच्या अँन्टीबॉडीज संबंधित ट्विट डिलीट

WHO, Covid 19, Corona Crisis, Patients Antibody

जिनिव्हा, २६ एप्रिल : चीनचा वुहान प्रांत कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू होता. इथून कोरोना विषाणूच्या प्रसारास सुरुवात झाली, वुहानमध्ये कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय, इथल्या दैनंदिन गोष्टी हळहळू पूर्वपदावर येत आहेत मात्र इथे नवी समस्या समोर आली होती. Sars-CoV-2 virus पासून पूर्णपणे बरे झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे न दाखवता त्यांच्या चाचण्या या ५० ते ७० दिवसांनतरही पॉझिटिव्ह येत होते. यामागचं कोडं चिनी डॉक्टरांनाही उलगडत नाहीये.

दरम्यान, याचसंबंधी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) शनिवारी एक ट्विट केलं होतं परंतु, थोड्यावेळानं हे ट्विट डिलीट करण्यात आलं. ‘कोविड १९ मधून बरे होणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात अँन्टीबॉडीज बनतात किंवा ते दुसऱ्यांदा संक्रमित होण्यापासून सुरक्षित आहेत, याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही’ असं या ट्विटमध्ये म्हटलं गेलं होतं.

WHO च्या याच ट्विटला कोट करताना, लोकांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, असं अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी आणि मेरीलँडमधील ‘इन्फेक्शिअस डिलीजेज’चे अध्यक्ष फहीम युनूस यांनी म्हटलंय. व्हायरल इन्फेक्शनवर मात करणारे रुग्ण रोगप्रतिकारक सक्षम असतात. त्यांची ही क्षमता महिन्यापासून ते काही वर्षांपर्यंत वापरली जाऊ शकते. पुराव्यांचा अभाव, हा अभावाचा पुरावा असू शकत नाही, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. त्यानंतर काही वेळाने जागतिक आरोग्य संघटनेनं आपलं ट्विट डिलीट केलं.

कोविड १९ चे रुग्ण दुसऱ्यांदा संक्रमित आढळल्याची दोन कारणं असू शकतात, असंही डॉ. युनूस यांनी सांगितलं. पहिलं कारण म्हणजे, टेस्टमध्ये मृत व्हायरल RNA समजला नसेल म्हणजेच कोणताही ऍक्टिव्ह आजार नसू शकतो. कोविड १९ रुग्ण दुसऱ्यांदा ‘पॉझिटिव्ह’ आढळले मात्र ते आजारी नाहीत, किंवा त्यांच्याद्वारे इतर कुणी संक्रमितही झाले नाहीत. साऊथ कोरियामध्येही असंच समोर आलं होतं. इथेल जवळपास २०० रुग्ण दुसऱ्यांदा ‘पॉझिटिव्ह’ आढळले होतं… परंतु, त्यांच्यामुळे इतरांपर्यंत संक्रमण पोहचलं नव्हतं.

तत्पूर्वी, चीनचा बचाव करताना WHOच्या प्रतिनिधींनी म्हटलं होतं की, चीनने आरोग्य सेवा पुरवणाऱ्या प्रत्येकाने उपचार करण्याला प्राधान्य दिले. त्यांनी त्यावेळी कागदोपत्री काम बाजूला ठेवले. कोरोना विषाणूने प्रभावित सर्व देशात अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागणार होतं. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर अन्य राष्ट्रांनी मृतांच्या आकड्यात सुधारणा करुन योग्य ती आकडेवारी सादर करणे अपेक्षित आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आपतकालीन विभागाचे संचालक मायकल रेयान यांनी म्हटले होते आणि चीनवर होणाऱ्या आरोपांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली होती.

 

News English Summary: The World Health Organization (WHO) sent a tweet on Saturday, but it was deleted shortly after. “There is no concrete evidence that people who recover from covid 19 develop antibodies in their bodies or that they are safe from a second infection,” the tweet said.

News English Title: Story why recovered Covid 19 patients testing positive again doctor rebukes WHO Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x