राजधानी काबूलसहित अफगाणिस्तानवर तालिबान्यांचा कब्जा | विमानतळांवरही कब्जा केला
काबूल, १५ ऑगस्ट | अफगाणिस्तान आता पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात आले आहे. तालिबान रविवारी काबूलमध्ये दाखल होताच अफगाणिस्तान सरकारने त्यांच्याशी करार करण्यास सहमती दर्शविली आहे. अफगाणिस्तान सरकारचे म्हणणे आहे की काबूलवर हल्ला न करण्यावरुन करार झाला आहे. तालिबान काबूलवर हल्ला करणार नाही. त्याचवेळी, तालिबानने असेही म्हटले आहे की त्यांना शांततेने हस्तांतरण हवे आहे. अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मीरजकवाल यांनी एक निवेदन जारी केले आहे की तालिबान काबूलवर हल्ला करणार नाही. शांततेत हस्तांतरण होईल.
काही वेळापूर्वी काबूलमध्ये दाखल झाले तालिबान:
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने काही काळापूर्वीच प्रवेश केला होता. बगराम विमानतळासह काही भागावरही कब्जा केला होता. तालिबानचा दावा आहे की सध्या संपूर्ण अफगाणिस्तान इस्लामिक अमीरातच्या ताब्यात आहे. तसेच काबूलमधील परिस्थितीवर नजर ठेवणाऱ्या एका राजकीय कार्यकर्त्याचे म्हणणे आहे की तालिबान सुरक्षा चौक्यांवर कब्जा करत आहे.
तालिबानने सांगितले होते की काबूलमध्ये युद्ध नाही, तर शांततापूर्ण मार्गाने सत्ता मिळवण्यासाठी चर्चा सुरू आहे. असेही म्हटले जाते की काबूल एक मोठी राजधानी आणि शहरी क्षेत्र आहे. तालिबानला येथे शांततेने प्रवेश करायचा आहे. ते काबूलच्या सर्व लोकांच्या जीवनाच्या आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेची हमी देत आहे. त्याचा कोणावर सूड घेण्याचा हेतू नाही आणि त्याने सर्वांना माफ केले आहे. त्याचवेळी, अफगाणिस्तानच्या सरकारी माध्यमांचे म्हणणे आहे की काबूलच्या अनेक भागात बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज ऐकले गेले आहेत.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी कागद जाळले:
अमेरिकन दूतावासाच्या छताजवळ धूर दिसून आला, दोन अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या मते राजनैतिक अधिकाऱ्यांनी संवेदनशील कागदपत्रे जाळल्यामुळे धूर झाला. झेक प्रजासत्ताकाने अफगाणिस्तानातील कर्मचाऱ्यांना आपल्या दूतावासातून बाहेर काढण्यासाठी तयारी सुरु केलीय. झेक प्रजसत्ताकनं त्यांच्या अधिकाऱ्यांना काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेले. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी शनिवारी सांगितले की ते 20 वर्षांची “मेहनत” वाया जाऊ देणार नाहीत. ते म्हणाले की तालिबानच्या हल्ल्यावरुन “चर्चा” सुरू आहे.
सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या:
अशरफ गनी यांनी शनिवारी दूरदर्शनद्वारे राष्ट्राला संबोधित केले. तालिबानने अलिकडच्या दिवसांत प्रमुख क्षेत्रांवर कब्जा केल्यानंतर ही त्यांची पहिली सार्वजनिक भाषण केलं आहे. एकीकडे अमेरिका आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न तीव्र करत आहे. तर, दुसरीकडे हजारो नागरिक काबूलमधील उद्याने आणि मोकळ्या जागांमध्ये आश्रय घेत आहेत. रविवारी काबूलमध्ये शांतता होती परंतु अनेक एटीएममधून पैसे काढणे बंद करण्यात आले होते, शेकडो लोक खाजगी बँकांबाहेर जमले होते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Taliban entered in Afghanistan capital Kabul from all sides after seized major cities news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो