22 February 2025 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज
x

क्रूर तालिबानी राजवटीपासून जगण्याची धडपड | अफगाणिस्तानमध्ये अजुनही भारतीय नागरिक अडकले

Taliban in Afghanistan

काबुल, १७ ऑगस्ट | अफगाणिस्तानच्या राजधानीत अजुनही भारतीय नागरिक अडकले आहेत. भारताकडून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्या ठिकाणी असलेल्या गैरव्यवस्थापनावर ते नाराज आहेत. अशात सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय नागरिक आपला रोष व्यक्त करत आहेत. त्यातील एकाने सांगितले, की आमचे कुणीही ऐकत नाही. फ्लाइट कधी येणार माहिती नाही. कुणी फोन सुद्धा उचलायला तयार नाही. बाहेर पाहा, गोळीबार सुरू आहे.

हे सर्व भारतीय विमानतळावर एका कोपऱ्यात बसून फक्त विमानाची वाट पाहत आहेत. सर्वांचे पासपोर्ट आणि कागदपत्रे सुद्धा तयार आहेत. यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारताकडून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी C17 ग्लोबमास्टर विमान पाठवले जात आहे. 129 भारतीयांना रविवारीच मायदेशी आणले गेले. सोबतच अफगाणिस्तानचे काही खासदार आणि उच्चायुक्त सुद्धा भारतात पोहोचले.

तत्पूर्वी, अपेक्षेप्रमाणे तालिबानी दहशतवाद्यांनी राजधानी काबूलवर कब्जा केला आहे. साधारण १५ ते २० दिवसांच्या आतच अफगाणी सैन्याचा पाडाव झाला. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी लाखो अफगाणी नागरिकांना शब्दश: वाऱ्यावर सोडून देशातून परागंदा झाले आहेत. आता मुल्ला अब्दुल गनी बरादर या तालिबानी प्रमुखालाच राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती पॅलेस ताब्यात घेतल्यावर तालिबान्यांनी तिथे जंगी ‘दावत’ केली. ही दावत यादवी आणि तालिबानच्या माथेफिरू राजवटीच्या या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात आहे. २० वर्षांपूर्वीच्या तालिबानी राजवटीची दहशत, धुमाकूळ अनेकांच्या स्मरणात असेल. अगदी तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवली आहे.

फरक एवढाच की, अमेरिका-रशियाचे यापूर्वीच हात पोळले आहेत. त्यामुळे या वेळी अमेरिकेेऐवजी चीन केंद्रस्थानी आला आहे. १९९६ च्या तालिबानी राजवटीला पाकिस्तानसह केवळ तीन देशांनी मान्यता दिली होती. आता तालिबान्यांनी सत्तास्थापनेची घोषणा करताच चीनने मैत्रीचा हात पुढे केला आहे. सुमारे दहा लाख अफगाणी नागरिकांनी आश्रयासाठी पाकिस्तानकडे धाव घेतली आहे. अनेकांनी इराणमार्गे तुर्कीकडे पलायन केले आहे. निर्वासितांचे हे लोंढे भारताकडेही येऊ शकतात. तालिबानप्रमुख बरादर याने अफगाणिस्तानात शांतता असेल असे सांगितले आहे. अर्थात, पुन्हा अंधारवाटेवर निघालेल्या अफगाणिस्तानसाठी ही शांततासुद्धा भयाण ठरू शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Taliban rules in Afghanistan alert alarm for world news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x