19 April 2025 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट
x

VIDEO | तालिबानच्या तावडीतून एअर इंडियाचं विमान कसंबसं सुटलं | काबुल विमानतळावर हौदोस

Taliban in Afghanistan

काबुल, १६ ऑगस्ट | अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सरकार स्थापन होणार आहे. भीतीच्या या वातावरणातून एअर इंडियाने काबूलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणले आहे. एअर इंडियाचे एक विमान रविवारी संध्याकाळी काबूलमधील भारतीयांसह दिल्लीला रवाना झाले होते.

उड्डाण रडारनुसार, एअरबस A320 विमान दिल्लीहून सकाळी 12.43 वाजता उड्डाण केले आणि दोन तासांनंतर दुपारी 1.45 वाजता काबूलमध्ये उतरले. तेच काबूलहून दुपारी 4.15 वाजता उड्डाण करणार होते, परंतु ते 5.03 वाजता उड्डाण करू शकले. हे विमानाने 129 प्रवासी परतले आहे.

काबुलमधून पळून जाताहेत लोक:
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापन करण्याच्या जवळ आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देश सोडून गेले आहेत. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अफगाण नागरिकांबरोबरच इतर देशांतील लोकही येथून पळून जात आहेत. काबूल विमानतळावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. तालिबानने लोकांना आश्वासन दिले आहे की काबूल सोडणाऱ्यांना बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल.

काबुल विमानतळावरही तालिबानींचा हौदोस:
अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडत असताना आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक होत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीकडे जगाचं लक्ष लागलं आहे. राजधानी काबूलमधील विमानतळावर सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे. त्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. काबुल विमानतळावरील परिस्थिती दाखवणारे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यातून परिस्थितीचं गांभीर्य आणि भीषणता दिसून येत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Taliban took a charge of Kabul Airport news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या