23 February 2025 8:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

खोदकामात मजुराला २ मौल्यवान दगड सापडले, किंमत मिळाली २५ कोटी

Tanzania Government, Paid Rs 25 crore, laborers stones, Sunnyniu Ledger

मुंबई, २६ जून : नशिबात असेल तर तुम्ही कोण, कुठे आणि काय करता याला महत्व नसते. कारण एका रात्रीत नशीब बदलू शकते याचा अनुभव तंजानिया येथे खाणीत काम करणाऱ्या मजुराला येत आहे. खाणीत खोदकाम करताना मजुराला दोन मौल्यवान दगड सापडले.

सुरुवातीला त्याने सामान्य दगड असतील असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र नंतर त्यात वेगळीच चमक असल्याचे दिसून आल्यानंतर त्याने याबाबत सरकारला माहिती दिली. सरकारी अधिकाऱ्यांनी या दगडांची चाचणी केली तेव्हा त्यांना धक्का बसला. सरकारने या दगडांच्या बदल्यात मजुराला तब्बल 25 कोटी रुपये दिले आहेत. सनिनीयू लैजर असे या मजुराचे नाव आहे. सनिनीयू याची 4 लग्न झाली असून तो 30 मुलांचा बाप आहे.

ही दोन्ही रत्ने निळसर वांगी रंगाची आहेत. यातील एका रत्नाचे वजन ९.२७ किलोग्राम आणि दुसरे रत्न ५.१०३ किलोग्राम वजनाचे आहे.टांझानियाच्या खाण मंत्रालयाने ही देशाच्या इतिहासातील इतके मोठे रत्न सापडलेली पहिली घटना असल्याचे म्हटले आहे. हे रत्न टांझानियाच्या एका बँकेने खरेदी केले आहे. हे रत्न सापडलेल्या मजुराचे नाव सॅनिनियु लेझर असे आहे. त्याला धनादेश देण्याचा कार्यक्रम टीव्हीवर लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आला. या मजुराला टांझानियाचे राष्ट्रपती जॉन मागूफुली यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

 

News English Summary: While digging in the mine, the laborer found two precious stones. They were shocked when government officials tested the stones. The government has paid Rs 25 crore to the laborers in exchange for these stones. The name of this laborer is Sunnyniu Ledger.

News English Title: Tanzania Government has paid Rs 25 crore to the laborers in exchange for these stones to laborer Sunnyniu Ledger News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x