18 January 2025 6:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरची पाकड्यांकडून सुटका; भारताविरुद्ध षढयंत्र

jaish e mohammad, chief masood azhar, Terrorist, Pakistan, Balakot, Pulawama Attack

इस्लामाबाद: भारतात अशांतता पसरवण्याच्या इराद्याने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची तुरूंगातून सुटका केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या तुरूंगातून गुपचूप मसूद अजहरची सुटका करण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिली आहे. परिणामी, पाकिस्तान पुन्हा एकदा मसूद अझहरचा वापर भारताविरोधात दहशतवादी हल्ल्यासाठी करण्याची शक्यता आहे. त्याच्या सुटकेनंतर पाकिस्तानने राजस्थान सीमेवर अतिरिक्त सैन्यही तैनात केले असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

‘पाकिस्तान अतिरेक्यांना अटक करतो असं सांगून कारवाईचा देखावा करत आहे. अमेरिका पाकिस्तानच्या या नापाक कारवाईवर विश्वास ठेवते. मात्र काही काळानंतर पाकिस्तान अतिरेक्यांची सुटका करून दहशतवादाला खतपाणी घालत आहे. त्यामुळे भारताविरोधात पुन्हा एकदा मसूद अझरचा वापर पाकिस्तान करू शकतो अशी आता भीती निर्माण झाली आहे’. अशी प्रतिक्रिया सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची सुटका केल्याची माहिती गुप्तचर विभागानं सरकारला दिली आहे. राजस्थानच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्याची कुमक वाढवण्यात आल्यानं सतर्क राहण्याचा इशारादेखील गुप्तचर विभागाकडून देण्यात आला आहे. कलम ३७० रद्द करण्यात आल्यानं पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोठा हल्ला करण्याची तयारी पाकिस्तानकडून सुरू असल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं इंग्रजी वृत्तपत्र ‘हिंदुस्तान टाईम्स’नं दिलं आहे.

दरम्यान, गुप्तचर यंत्रणांना LOC वर पाकिस्तान दहशतवाद्यांचे ८ कॅम्प आणि लॉन्च पॅडची ओळख पटली आहे. इथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असून भारतात घुसखोरीची तयारी सुरु असल्याची माहीती समोर येत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या जवानांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या संभाव्य कारवायांबाबत सतर्कही केलं आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हॅशटॅग्स

#India Pakistan(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x