डियाओस बेट ताब्यात घेण्यावरून चीनची जपानला सैन्य कारवाईची धमकी
टोकियो, २१ जून : भारतात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सीडीएस जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेना प्रमुखांशी उच्चस्तरीय बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षणमंत्र्यांनी आढावा बैठकीत वास्तविक नियंत्रण रेषेवरील चिनी सैन्याच्या कोणत्याही प्रकारच्या आक्रमक वृत्तीला उत्तर देण्यासाठी सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. आतापासून भारत सीमेचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या धोरणात्मक पद्धतींचा अवलंब करेल. पूर्वेकडील लडाख व इतर क्षेत्रातील चीनच्या कोणत्याही हल्ल्याचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.
समोरासमोर उभ्या ठाकलेल्या उभय बाजूच्या सैनिकांमध्ये कोणत्याही क्षणी ठिणगी पडून या भागातील स्थिती आणखी खालावण्याची शक्यता आहे. गलवान खोऱ्यातील सैनिकांचे मृत्यू ही भारत-चीन सीमेवर गेल्या ४५ वर्षांत झालेली पहिलीच घटना आहे. या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांनी १९९३ मध्ये केलेल्या करारानुसार या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशा घटनांत अग्निशस्त्रांचा वापर न करण्याचे ठरले आहे. गलवान खोऱ्यातील घटनेमुळे या कराराबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे लडाखमध्ये उभय बाजूच्या सैनिकांच्या माघारीच्या प्रक्रियेलाही मोठी खीळ बसली आहे.
मात्र भारत, तैवान, हाँगकाँगनंतर आता चीनची नजर जपानच्या बेटांवर गेली आहे. यामुळे जपानसोबत वाद पेटण्याची शक्यता असून अमेरिकाही यामध्ये थेट उडी घेण्याची दाट शक्यता आहे. चीन आणि जपान दोघेही या निर्जन बेटांवर दावा करतात. या बेटांना जपानमध्ये सेनकाकू आणि चीनमध्ये डियाओस नावाने ओळखले जाते. या बेटांवर चीनची सत्ता नसून १९७२ पासून सारे हक्क जपानकडेच आहेत. तर चीनचा दावा असा आहे की ही बेटं चीनच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. यामुळे या बेटांचा दावा जपानने सोडून द्यावा. एवढेच नाही तर चीनची कम्युनिस्ट पार्टीने या बेटांचा ताबा मिळविण्यासाठी सैन्य कारवाई करण्याची धमकीही देऊन टाकली आहे.
जपानचे नौदल करते सुरक्षा सेनकाकू बेटं जपानच्या ताब्यात आहेत. यावर चीनचा डोळा असल्याने जपानचे नौदल याची सुरक्षा पाहते. अशामध्ये जर चीनला या बेटांचा ताबा मिळवायचा असेल तर त्याला जपानसोबत युद्ध करावे लागणार आहे. मात्र, जगातील तिसरी सर्वात मोठी सैन्य ताकद असलेल्या चीनला हे करणे सहज सोपे नाहीय. गेल्या आठवड्यात चीनच्या काही युद्धनौका या बेटाजवळ गेल्या होत्या. यावरून जपान आणि चीनमध्ये तणाव वाढून त्याचे पर्यावसान धुमश्चक्रीमध्ये होण्याची मोठी शक्यता होती.
जपानला अमेरिकेचे संरक्षण जर चीनला जपानवर हल्ला करायचा असेल तर आधी अमेरिकेसोबत लढावे लागणार आहे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर पर्ल हार्बरवर लष्करी तळ बनविताना अमेरिका आणि जपानमध्ये एक करार झाला होता. यानुसार जपानच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी ही अमेरिकेची असणार आहे. यामुळे जर चीनने जपानवर हल्ला केला तर तो अमेरिकेवर हल्ला केला असे मानले जाणार आहे. असे झाल्यास अमेरिका या युद्धात उतरणार आहे. आणि जर जपान आणि अमेरिकेने चीनवर हल्ला केल्यास तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटणार आहे, हे सर्वज्ञात आहे.
News English Summary: After India, Taiwan and Hong Kong, China’s eyes are now on the islands of Japan. These islands are known as Senkaku in Japan and Diaos in China. China claims that these islands fall under Chinese jurisdiction. Therefore, Japan should give up its claim to these islands. The Chinese Communist Party has also threatened military action to seize control of the islands.
News English Title: The Chinese Communist Party has also threatened Japan about military action to seize control of the Diaos islands News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार