जगातील सर्वात कडक लॉकडाऊन | ब्रिटनमध्ये तब्बल ९७ दिवसांनी अनलॉक प्रक्रिया सुरु
लंडन, १४ एप्रिल: देशभरात कोरोना संसर्ग वेगाने वाढतोय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती तयार झालीय. महाराष्ट्रातही तिच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात जवळपास लॉकडाऊन लागणार हे निश्चित झालंय. त्यामुळे संपूर्ण देशाचं महाराष्ट्राकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या आर्थिक गणितांवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम दिसलेला नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, जगभरात भारतापेक्षा अधिक भयानक परिस्थिती असल्याचं समोर आलं आहे.
ब्रिटन ९७ दिवसांनंतर पूर्ववत होत आहे. जगातील सर्वात लांब व कडक लॉकडाऊन सोमवारपासून अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना अनियंत्रित झाल्याने ५ जानेवारीपासून ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू होता. डिसेंबरपासून ब्रिटनमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध लागू होते. आता पुन्हा अनेक महिन्यांनंतर शेकडो जिम, हेअर सलून, रिटेल दुकाने सुरू झाली. नियोजित योजनेनुसार २१ जूनला पूर्णपणे लॉकडाऊन हटवला जाईल.
४ जानेवारी रोजी जॉन्सन यांनी नवीन निर्बंधांची घोषणा केली होती. तेव्हा प्रत्येक गोष्ट स्पष्ट होती. कोणते क्षेत्र कधी बंद असेल व कोणते सुरू होईल, हे जाहीर होते. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळाची स्थिती नव्हती. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसऱ्या बाजूने लसीकरण करून ब्रिटनने कोरोनाचा वेग नियंत्रित केला. युरोपला मंदगतीने लसीकरण व लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची वेळ आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये दररोज ५५ हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळत होते. आता नव्या रुग्णांची संख्या ४ हजारांहून खाली आहे. ब्रिटनने आपल्या ४८ टक्के लोकसंख्येला लस दिली आहे.
News English Summary: Britain is recovering after 97 days. The world’s longest and toughest lockdown has been unlocked since Monday. The lockdown was imposed in Britain from January 5 due to uncontrolled corona. A number of restrictions have been in place in Britain since December.
News English Title: The Great Britain world’s longest and toughest lockdown has been unlocked since Monday news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो