21 November 2024 10:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अमेरिकन संस्थेच्या इशाऱ्यानुसार भारतात ऑगस्टपर्यंत १० लाख मृत्यू झाल्यास त्याला मोदी सरकारचं जबाबदार असेल - द लॅन्सेट संपादकीय

The Lancet

वॉशिंग्टन, ०८ मे | भारतात गर्दीच्या कार्यक्रमांमुळे कोरोनाचा धोका अधिक तीव्र होऊ शकतो, असा इशारा देण्यात आलेला असताना देखील मोदी सरकारने देशातील कोट्यवधी लोकांना आकर्षित करणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना परवानग्या दिल्या. राजकीय प्रचारसभा घेण्यात आल्या, असं म्हणत वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध नियतकालीक असलेल्या द लॅन्सेटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘द लॅन्सेट’ने संपादकीयमधून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

टीका करताना काय म्हटले आहे ‘द लॅन्सेट’ने संपादकीय मध्ये?

  1. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मोदी सरकारने ट्विटरवरील टीकाकारांना गप्प करण्याकडे प्राधान्य दिलं.
  2. संकटाच्या काळात होणारी टीका आणि खुल्या चर्चेत अडथळा आणण्याची मोदी सरकारची कृती अक्षम्य असल्याचं देखील म्हटलं आहे.
  3. इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ या संस्थेनं दिलेल्या इशाऱ्याचा हवाला संपादकीयमध्ये कोट करून देण्यात आला आहे.
  4. भारतात १ ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे दहा लाख लोकांचा मृत्यू होईल, असा अंदाज या संस्थेनं व्यक्त केलेला आहे. ”जर हे घडलं, तर या राष्ट्रीय आपत्तीला मोदी सरकारचं जबाबदार असेल.
  5. करोनाचा संसर्ग अधिक वेगाने होण्याचा धोका असलेल्या कार्यक्रमांबाबत इशारा दिलेला असतानाही सरकारने लाखो लोक गर्दी करतील अशा धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली.
  6. मोठ मोठ्या राजकीय सभा घेतल्या.
  7. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायाचा प्रचंड अभाव आहे.
  8. केवळ रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर कोरोनावर विजय मिळविल्याच्या फुशारक्या मारण्यास सुरूवात केली.

दुसरीकडे, जगात कोरोना महामारी येऊन जवळपास एक वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला गेला आहे. विविध तज्ञ कोरोना महामारी कशी आली याचा अभ्यास करत आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस हवेतून पसरु शकत असल्याचा दावा केला आहे. कारण आतापर्यंत यावर वेगवेगळे दावे करण्यात आले असून कोणीही याबाबत ठोस पुरावा दिला नव्हता.

डब्ल्यूएचओने नुकतेच कोरोना व्हायरसवर नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केले आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, कोरोना व्हायरस हे खराब वायुजीवन, लोकांच्या गर्दीच्या ठिकाणी फैलण्याचा धोका जास्त असतो. कारण अशा ठिकाणी व्हायरस एरोसोलच्या माध्‍यमातून खूप दूरपर्यंत जात असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या गाइडलाइनमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे डब्ल्यूएचओने आतापर्यंत कोरोना व्हायरस हवेतून पसरतो याचा पुरावा नसल्याचे सांगितलेले होते.

 

News English Summary: Despite warnings that the corona threat could be exacerbated by crowded events in India, the Modi government allowed religious events that would attract billions of people across the country. The Lancet, a well-known medical journal, has targeted Prime Minister Narendra Modi, saying political rallies were held. The Lancet has criticized Prime Minister Modi in an editorial.

News English Title: The Lancet slams Modi govt through editorial over corona pandemic in India news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x