17 April 2025 5:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

भारत चीनमधील सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्णपणे थांबली, भारताकडून सज्जतेची तयारी

Indian China, Ladakh, Leh, Troops withdrawing stop

नवी दिल्ली, २२ जुलै : लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनबरोबर संघर्ष निर्माण झालेल्या ठिकाणी आता सैन्य माघारीची आणि सैनिक संख्या कमी करण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. तिथे एक प्रकारची कोंडी निर्माण झाली असून तणावाची स्थिती ही दीर्घकाळ राहणार आहे. त्या दृष्टीने भारताने आपली तयारी सुरु केली आहे.

नियंत्रण रेषेजवळ चीनने जी, सैन्य तटबंदी उभी केली आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून भारताने सुद्धा आपले तितकेच सैनिक तैनात केले आहेत. या सैन्य तुकडयांना दीर्घकाळासाठी तिथेच ठेवण्याची भारतीय लष्कराची तयारी आहे. १४ जुलैला क़ॉर्प्स कमांडर्समध्ये चौथ्या फेरीची चर्चा झाली. त्यानंतर सैन्य माघारीची कोणतीही हालचाल झालेली नाही. पूर्व लडाखमध्ये एकूण चार ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिक आमने-सामने आले होते. त्यापैकी दोन ठिकाणी सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढच्या फेरीची चर्चा होईल की, नाही याबद्दल अनिश्चितता आहे असे सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे भारतानंतर आता अमेरिकेनं दक्षिण चीनच्या समुद्रातील वादग्रस्त भागात जवळपास ४००० किमीपर्यंत फिलिपिन्स समुद्रात जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलासह युद्धाभ्यास सुरु केला आहे. या युद्धाभ्यासासंदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये चीनच्या नावाचा उल्लेखही नाही. दक्षिण चीनी समुद्राच्या अधिकाधित भागात चीन आपला दावा करत आहे. माहितीनुसार, तीन देशांच्या या युद्धाभ्यासात १२ फायटर जेट आणि ९ युद्धनौकांचा वापर करण्यात आला आहे. या अभ्यासात अमेरिकेने यूएसएस रोनाल्ड रीगनलाही सहभागी करुन घेतले आहे. अमेरिका चीनवर समुद्रमार्गेही सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

भारतीय नौदलाने हिंद महासागरातील त्या क्षेत्रात गस्त वाढविण्यास सुरुवात केली आहे, जिथं चीनी सैन्यासोबत सातत्याने सामना होतो. महासागरातील चीन नौदलाचा वाढता प्रभाव पाहता, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि फ्रान्सच्या नौदलाने हिंद व प्रशांत महासागरात आपली मैत्री घट्ट केल्याचं दिसून येत आहे.

 

News English Summary: The process of withdrawing troops and reducing troop numbers has now come to a complete halt in Ladakh, where clashes with China have erupted near the Line of Control. There is a kind of dilemma and the state of tension is going to last for a long time.

News English Title: The process of withdrawing troops and reducing troop numbers from Ladakh is totally stop News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या