27 December 2024 8:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

पहिली लाट ओसरताच प्रचंड सभा, गर्दीचे सोहळे आणि मंदगतीने होणाऱ्या लसीकरणामुळे परिस्थिती हाताबाहेर - WHO

India corona pandemic

जिन्हिवा, २९ एप्रिल | कालच्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे ३२९३ रुग्णांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ जणांनी करोनावर मात केली आहे. मात्र देशात कोरोना वेगाने पसरतोय आणि देशाची चिंता वाढताना दिसतेय.

दरम्यान, भारतातील भयावह कोरोना लाटेसाठी विषाणूचे केवळ एक म्युटेशन जबाबदार नसून त्यामागे अनेक कारणे आहेत. वास्तविक पहिली लाट ओसरताच मोठमोठ्या सभा, प्रचंड गर्दीचे सोहळे, कोरोनाचे अनेक व्हेरिएंट आणि मंदगतीने होणारे लसीकरण यामुळे भारतातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे परखड मत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नोंदवले आहे

भारतात आलेल्या कोरोना सुनामीसाठी केवळ एक म्युटेशन जबाबदार नाही. कोरोनाचे नियम पाळले नसल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या काही आठवड्यात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडण्याच्या मार्गावर आहे, अशा शब्दांत डब्ल्यूएचओचे प्रवक्ते तारिक जसारेव्हिव यांनी लक्ष वेधले.

कोरोना रुग्णांपैकी केवळ १५ टक्के लोकांना रुग्णालयात उपचारांची गरज पडते. त्यामध्येही अत्यंत कमी रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. मात्र योग्य माहिती मिळत नसल्याने भारतात लोक आपल्या नातेवाइकांना रुग्णालयात भरती करण्याची घाई करीत आहेत. ८५ टक्के रुग्णांवर घरीच उपचार केले जाऊ शकतात. लोकांना घरगुती उपचाराविषयी माहिती देणे गरजेेचे आहे, असे तारिक म्हणाले. तर अध्यक्ष तेद्रोस अॅडहॉनम घेब्रयासिस म्हणाले की, भारताला ४००० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरचा पुरवठा केला जाणार असून २ हजार तज्ज्ञांचा ताफाही भारतात पाठवला जाणार आहे.

 

News English Summary: Not just one mutation of the virus is responsible for the dreaded corona wave in India but there are many reasons behind it. The World Health Organization (WHO) has reported that the corona situation in India has worsened due to large gatherings, huge crowds, multiple variants of the corona and slow vaccinations since the first wave.

News English Title: The situation in India deteriorated due to non observance of corona rules corona India said World Health Organization news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x