18 January 2025 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

The statue of Mahatma Gandhi, desecrated in America

वॉशिंग्टन,४ जून : अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान ही घटना घडली. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

अमेरिकेत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जगभरात उमटू लागले आहेत. पॅरिस, सिडनी अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा आणि न्यूझीलंड या देशांमध्येही अनेक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदविला आहे. मागील शुक्रवारी व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत आंदोलने सुरू आहेत.

 

News English Summary: The statue of Mahatma Gandhi has been desecrated in the United States. Violent protests erupted in the United States following the death of George Floyd. The incident took place during the violence. There is a statue of Mahatma Gandhi outside the Indian Embassy in Washington DC.

News English Title: The statue of Mahatma Gandhi has been desecrated in the United States News Latest Updates.

हॅशटॅग्स

#America(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x