21 April 2025 11:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

७ दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा १ कोटीवर जाणार - WHO'चा गंभीर इशारा

World Health Organization, Corona virus

वॉशिंग्टन, २५ जून : कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली.

भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 485,122 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 95 लाख लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.

येत्या ७ दिवसांत म्हणजेच पुढच्या आठवड्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल १ कोटींवर पोहोचणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. WHO ने हा गंभीर इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेडरॉस अधनॉम यांनी पुढच्या आठवड्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या एक कोटींवर पोहोचू शकते असं म्हटलं आहे.

 

News English Summary: The World Health Organization (WHO) has said that the number of coronaviruses will reach 1 crore in the next seven days. The WHO has issued a stern warning. Tedros Adhnom, director general of the World Health Organization, said the number of corona cases could reach one crore next week.

News English Title: The World Health Organization has said that the number of coronaviruses will reach 1 crore in the next seven days News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या