17 April 2025 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

ब्राझीलमध्ये कोरोनास्थितीत अपयशी ठरलेल्या राष्ट्रपतींना हटवण्यासाठी जनता रस्त्यावर | भारतीयांनी तीच आयडिया केली तर?

Jair Bolsonaros

मुंबई, ०१ जून | ब्राझीलच्या सुमारे २०० शहरांत शनिवारी निदर्शने झाली. ‘बोल्सोनारो आऊट’, ‘गो अवे बोल्सोव्हायरस’ अशा घोषणांनी ही शहरे निनादली. अडीच वर्षांपूर्वी अध्यक्षपदी विराजमान झालेल्या जाइर बोल्सोनारो यांच्याबद्दल करोनास्थितीवरून जनतेचा भ्रमनिरास झाला. त्यांची लोकप्रियता उत्तरोत्तर घटत गेली आणि जनक्षोभ वाढत गेला. त्याचा वेध घेत माध्यमांनी बोल्सोनारो यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत जगात ब्राझील तिसऱ्या, तर बळींच्या संख्येत दुसऱ्या स्थानी आहे. आतापर्यंत तिथे चार लाख ६० हजार करोनाबाधितांचा बळी गेला. मुळात करोनाबाबत बोल्सोनारो यांच्याकडे सुरुवातीपासूनच गांभीर्याचा पूर्णत: अभाव होता, याकडे जगभरातील माध्यमांनी लक्ष वेधले आहे. करोना रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्यास नकार देताना बोल्सोनारो यांनी अर्थव्यवस्था वाचविण्यावर भर असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांना ना अर्थव्यवस्था वाचवता आली, ना जनतेचे प्राण. त्यांनी करोनाचा अनियंत्रित फैलाव होऊ दिला आणि लशीही उपलब्ध करून दिल्या नाहीत, यावर ‘द गार्डियन’ने नेमके बोट ठेवले आहे.

ब्राझीलमधील लस तुटवडय़ाचा मुद्दा प्रसार माध्यमांनी विस्ताराने मांडला आहे. या देशात लसीकरण संथ गतीने सुरू आहे. सुरुवातीला ब्राझीलने अनेक परदेशी कंपन्यांच्या लशी नाकारल्या. या लशी वेळेत उपलब्ध झाल्या असत्या तर लसीकरण वेगाने झाले असते आणि मनुष्यहानी कमी झाली असती, याकडे प्रसार माध्यमांनीच्या वृत्तलेखात लक्ष वेधण्यात आले आहे.

बोल्सोनारो यांची लोकप्रियता कमालीची घटली आहे. बोल्सोनारो यांच्या करोनास्थिती हाताळणीबाबत सीनेटकडून चौकशी सुरू आहे. त्यातच बोल्सोनारोंविरोधात आंदोलन सुरू असल्याने त्यांच्यावर महाभियोग खटला चालविण्याच्या मागणीला बळ मिळाले. ब्राझीलच्या सुमारे ५७ टक्के नागरिकांनी महाभियोग कारवाईस पाठिंबा दिल्याचे ताज्या सर्वेक्षणातून दिसून आले.

याच विषयाला अनुसरून फिल्ममेकर विनोद काप्री यांनी आंदोलनाचा एक ट्विट करत अप्रत्यक्षरीत्या भारतीयांना देखील सल्ला दिला आहे असं म्हटलं जातंय. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलंय की, “कोविड१९ परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे आणि ब्राझीलमध्ये 4 लाख 60 हजार लोकं मृत्यूमुखी पडले आहेत आणि या विरोधात राष्ट्रपती जाइर बोल्सोनारो यांच्या विरोधात देशभरात तीव्र निदर्शने होत आहेत. संतप्त लोक अध्यक्षांना हटवण्यासाठी आक्रमक झाले आहेत… ही कल्पना भारतीय तर चोरणारा नाहीत ना

 

News English Summary: Thousands of people in Brazil staged another day of protest against President Jair Bolsonaro, in particular for his chaotic handling of the pandemic, which has claimed more than 461,000 lives here. In downtown Rio de Janeiro, some 10,000 people wearing masks marched through the streets, with some chanting “Bolsonaro genocide” or “Go away Bolsovirus.”

News English Title: Thousands protest in Brazil against president Jair Bolsonaros Covid response video shared by Vinod Kapri news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या