23 February 2025 2:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

ट्रम्प सरकारकडून H-1B व्हिसाधारकांना मोठा दिलासा | भारतीयांना सर्वाधिक फायदा

Trump Admin, Relaxes H1b Visa Ban, Workers To Return, America

वॉशिंग्टन, १३ ऑगस्ट : अमेरिकेने एच -१ बी व्हिसावरील (H-1B visa) काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे की, व्हिसाधारकांना निवडक प्रकरणात अमेरिकेत येण्याची परवानगी मिळावी म्हणून नियमात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आयटीआयमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमेरिकेच्या या निर्णयाचा विशेषत: व्हिसा बंदीमुळे अमेरिकेतील नोकरी सोडणाऱ्यांना फायदा होईल.अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, एच -१ बी व्हिसा धारकांना निर्बंध जाहीर होण्यापूर्वी ज्या कंपनीशी ते संबधित होते, त्याच कंपनीकडे नोकरी मिळविण्यासाठी परत जायचे असेल तर त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. अशा धारकांसह त्यांचे कुटुंबीय (जोडीदार आणि मुले) यांनाही अमेरिकेत जाण्याची परवानगी दिली जाईल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांना अमेरिकेत रोजगाराची संधी देणाऱ्या H-1B सह वेगवेगळया व्हिसांवर बंदी आणली होती. या व्हिसामुळे अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या संकटात येतात असा ट्रम्प यांचा दावा आहे. करोना व्हायरसमुळे अमेरिकेत लॉकडाउन होता. त्यामुळे तिथे मोठया प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. अशा काळात तिथल्या लोकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी वेगवेगळया व्हिसावर बंदी आणली होती. पण आता त्यांनी H-1B व्हिसाधारकांना दिलासा दिलाय.

 

News English Summary: The ruling Donald Trump administration in the United States has given relief to H-1B visa holders. Restrictions on H-1B visas have been relaxed. Earlier, the Trump administration imposed a ban on H-1B visa holders from entering the United States.

News English Title: Trump Admin Relaxes H1b Visa Ban Allows Workers To Return To Us For Same Job News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x