15 January 2025 11:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

अमेरिका लॉकडाउन हटविण्याच्या तयारीत; आर्थिक कोंडी झाल्याने निर्णय

America, US President Donald Trump, Lockdown

वॉशिंग्टन, १ मे: कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये लागू केलेली सुरक्षित वावरासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांची मुदत आज गुरुवारी संपत असून, ही मुदत वाढविणार नसल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी स्पष्ट केले. दरम्यान, ट्रम्प यांचे जावई व सल्लागार जेरेड कुश्नेर यांनी येत्या जुलै महिन्यापर्यंत अमेरिकेला पुन्हा एकदा वैभव प्राप्त होईल, असे म्हटले आहे.

अनेक कंपन्यान्यांचे कामकाज वर्क फ्रॉम होम सुरू आहे. बंदमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. जवळपास २ कोटी ६० लाख नोकरदारांनी बेरोजगारीच्या फायद्यासाठी दावे दाखल केले आहेत. दाव्यांची ही संख्या लवकरच तीन कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक राज्यांतून अर्थ व्यवहार सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. ट्रम्प यांनी १६ एप्रिल रोजी व्यवहार हळूहळू सुरु करण्याची सूचनाही केली होती. विमा कंपन्यांना बेरोजगारांना भत्ता द्यावा लागू नये म्हणून या कंपन्या अर्थव्यवहार सुरू करण्यासाठी दबाव टाकत असल्याचेही बोलले जात आहे.

दुसरीकडे कोरोना विषाणूने सर्वाधिक प्रभावित अमेरिका झाली असून आतापर्यंत ६३ हजार नागरिकांनी प्राण गमावले असून, १० लाखांहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. जगभरातील कुठल्याही देशातील ही सर्वाधिक संख्या आहे. अमेरिकेसाठी दिलासादाक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख ५५ हजार जणांनी या महामारीचा पराभव केला आहे.

 

News English Summary: US President Donald Trump made it clear on Thursday that the safety guidelines in the United States for exposure to the corona virus expire on Thursday and will not be extended. Meanwhile, Trump’s son-in-law and adviser Jared Kushner has said that the United States will once again be glorified by next July.

News English Title: Trump government decided to no lockdown ahead in America even corona crisis is still raising in the country News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x