18 January 2025 6:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

Twitter वर सर्वात मोठी हॅकिंग, दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स सुद्धा हॅक

Twitter Hack, Jeff bezos, Elon Musk, Bill Gates

वॉशिंग्टन, १६ जुलै : माइक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर बुधवारी रात्री मोठा हल्ला झाला. ट्विटर कंपनीसाठी ही रात्र आव्हानात्मक होती. बराक ओबामा, बिल गेट्ससह अनेक मोठ्या व्यक्तींचे अकाऊंट हॅक झाले होते. त्यानंतर कंपनीने अनेक जणांचे अकाऊंट बंद केले होते. अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सकडून बिटकॉइनच्या रुपात दान मागण्यात येत होतं. दरम्यान, ट्विटने ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये माइक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क, अमेरिकी रॅपर कान्ये वेस्ट, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, बराक ओबामा, इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, वॉरेन बफेट, अँप्पल, उबरसह अन्य ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहेत.

हॅकर्सने अकाऊंट हॅक करुन, ‘बिटकॉइनच्या रुपात दान करा आणि तुमचे पैसे दुप्पट करुन पुन्हा पाठवू.’ असे ट्विट करण्यात आले होते. आता वेळ आली आहे, आपण जे समाजाकडून कमवलं आहे. त्यांना ते परत करण्याची. अशा पद्धतीने बिटकॉइनच्या रुपात दान मागण्यात आले होते. इतक्या मोठ्या प्रोफाइलवरुन ट्विट करण्यात आलं. म्हणजे लोकांना खरंच वाटलं. सायबर सेक्योरिटी हेड अल्पेरोविच यांनी म्हटलं की,सामान्य लोकांना काही प्रमाणात नुकसान झालं आहे. हॅकर्सने जवळपास 300 लोकांकडून 1 लाख 10 हजार डॉलर बिटक्वाईन काढले.

 

News English Summary: The official Twitter accounts of Apple, Elon Musk, Jeff Bezos and others were hijacked on Wednesday by scammers in a massive hack, who according to cyber police were trying to dupe people into sending cryptocurrency bitcoin.

News English Title: Twitter accounts of Jeff bezos Elon Musk Bill Gates and others hit in major hack News Latest Updates.

हॅशटॅग्स

#twitter(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x