24 November 2024 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

७२ तासांमध्ये दूतावास खाली करण्याचे चीनला आदेश, चीनने लगेच गोपनीय कायदपत्रं जाळली

U S Government, Orders China, Houston Consulate

वॉशिंग्टन, २२ जुलै : अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढत जात आहे. ट्रम्प सरकारने या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी ट्रम्प यांनी चीनला ह्युस्टनस्थित (Houston Consulate) महावाणिज्य दूतावास ७२ तासांत बंद करण्याचा आदेश दिला आहे.

अमेरिकेच्या या आदेशानंतर दूतावासात गोंधळ उडाला आहे. काहींच्या मते अमेरिकेच्या या आदेशानंतर चीनच्या दूतावासात धूर येत असल्याचे दिसत आहे. काहींनी दिलेल्या माहितीनुसार चिनी कर्मचारी गोपनीय कायदपत्रं जाळत आहेत. अमेरिकेच्या या आदेशानंतर चीनदेखील भडकला आहे. आणि या आदेशानंतर प्रत्युत्तर देणार असल्याचं सांगितलं आहे.

अमेरिका व चीन यांच्यातील संबंधात दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे. चीनविरोधात टीका करणाऱ्या ट्रम्प प्रशासनानं चीनला थेट ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेन्बिन याविषयी बोलताना म्हणाले,”ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्यासंबंधी चीनला मंगळवारी माहिती देण्यात आली. अमेरिकेनं हा चुकीचा निर्णय मागे घ्यावा असा आग्रह चीननं केला आहे. नाहीतर चीनही या निर्णयाविरोधात आवश्यक व योग्य पावलं टाकेल,” असा इशारा चीननं अमेरिकेला दिला आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. जर अमेरिकेने हा चुकीचा आदेश मागे घेतला नाही, त्याचा ‘न्याय्य व आवश्यक सूड’ घेतला जाईल. दूतावातातून येणारे आगीचे लोट पाहिल्यानंतर ह्युस्टन अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी पोहोचली, परंतु ती दूतावासाच्या आत गेली नाहीत. अमेरिकेच्या या निर्णयाने चीनशी असलेले त्याचे संबंध अधिक तणावग्रस्त होण्याची शक्यता वाढली आहे.

 

News English Summary: Tensions are rising between the US and China. The Trump administration has made a big decision against this backdrop. On Wednesday, Trump ordered China to close its consulate in Houston within 72 hours.

News English Title: U S Government Orders China To Close Its Houston Consulate In 72 Hours News Latest Updates.

 

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x