19 April 2025 6:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

भारताला डब्ल्यूएचओ'मध्ये ३ वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्षपद

WHO, World Health Organization, Health Minister Harsh Vardhan

नवी दिल्ली, 20 मे : कोरोनाच्या लढाईत भारताने केलेल्या कामाचं कौतुक जागतिक स्तरावर केलं जात आहे. भारतानं कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगालाही मदत झाली आहे. याचेच फलित म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे. हर्षवर्धन २२ मे रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळते.

डॉ. हर्षवर्धन हे जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा घेणार आहेत. सध्या डॉ. नकतानी हे या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झालं. १९४ देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्याही केल्या असं एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. तसंच तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर भारतीची नियुक्ती केली जाईल असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समुहानं सर्वांच्या संमतीनं घेतला होता. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन यांची निवड २२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत होईल. क्षेत्रीय गटांमध्ये अध्यक्ष पद एक वर्षासाठी दिलं जातं. गेल्या वर्षी हे ठरवण्यात आलं होतं. येत्या शुक्रवारपासून यातील पहिलं वर्ष सुरू होणार असून यासाठी भारताचा प्रतिनिधी कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष असणार आहे. या कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात आणि यापैकी जानेवारी महिन्यात मुख्य बैठक होते. आरोग्य सभेनंतर त्वरीत मे महिन्यात या मंडळाची एक बैठक आयोजित करण्यात येते. आरोग्य सभेच्या सर्व निर्णयांना आणि धोरणांना प्रभावी बनवण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांकडे असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

News English Summary: India’s work in the Corona War is being lauded globally. The steps taken by India to stop Corona have also helped the world. As a result, Union Health Minister Dr. Harshvardhan has been elected as the Executive President of the World Health Organization. It is learned that Harshvardhan will assume office on May 22.

News English Title: Union Health Minister Harsh Vardhan Set To Be Who Executive Board Chairman Says Official Coronavirus News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या