9 January 2025 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा भारतात येण्याच मार्ग मोकळा | केंद्राचा निर्णय

Union Home Ministry, International Travelers, Tourist Visa

नवी दिल्ली, २२ ऑक्टोबर : अनलॉक ५.० अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु झालेल्या असताना केंद्र सरकारने आता व्हिसा वरील निर्बंध सुद्धा शिथील केले आहेत. ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना तसेच परदेशी नागरिकांना भारतात यायचे असेल, तर त्यांना हवाई आणि समुद्री मार्गाने प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त पर्यटन व्हिसाला अजून परवानगी देण्यात आलेली नाही.

इलेक्ट्रॉनिक व्हिसा आणि पर्यटक व्हिसा वगळता सर्व व्हिसा तात्काळ प्रभावाने पूर्ववत करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. परदेशी नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी भारतात यायचे असेल, तर ते त्यांच्यासह देखभाल करणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करु शकतात.

व्हिसाची मुदत संपली असेल तर, ते नव्याने व्हिसासाठी अर्ज करु शकतात. या निर्णयामुळे व्यवसाय, कॉन्फरन्स, नोकरी, अभ्यास, संशोधन आणि वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी नागरिक भारतात येऊ शकतात. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून व्हिसावर सुद्धा निर्बंध घालण्यात आले होते.

 

News English Summary: It has been decided to permit all OCI and PIO card holders and all other foreign nationals intending to visit India for any purpose, except on a Tourist Visa to enter by air or water routes through authorized airports and seaport immigration check posts, MHA said in a statement.

News English Title: Union Home Ministry Permits Entry Of All International Travelers Except On A Tourist Visa To Enter By Air Or Water Routes news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x