5 November 2024 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

ट्रम्प आणि बायडन यांच्यात अटीतटीची लढत | पण सत्तांतराचे संकेत

United States Presidential election 2020, Counting result, live updates

वॉशिंग्टन, ०५, नोव्हेंबर: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणीला कालपासूनच सुरुवात झाली आहे. दरम्यान, सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेथील मतदार वर्ग मोठ्या प्रमाणावर राजकीय दृष्ट्या विभाजित झाल्याचे स्पष्ट झालं आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांना आव्हान देणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन या दोघांनी आपापले पारंपरिक मतदार गड स्वतःकडे राखले आहेत. त्यामुळे नेमका निकाल काय लागणार याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

परिणामी निकाल फिरवू शकतील अशा मोजक्या राज्यांकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे. तर दुसऱ्याबाजूला ट्रम्प यांनी आपलाच विजय होणार असा ठामपणे दावा केला होता. यावरून डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.

 

News English Summary: The counting of votes has begun since the actual voting for the US presidency ended. Meanwhile, according to the initial counting of votes, the current President Donald Trump and the Democratic candidate Joe Biden are facing a fierce battle.

News English Title: United States Presidential election 2020 vote counting result live news updates

हॅशटॅग्स

#America(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x