22 February 2025 7:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

अमेरिका व चीन शीतयुद्धाच्या जवळ; चीनच्या परराष्ट्र मंत्र्याचं धक्कादायक विधान

US and China Cold War, Corona Crisis, Wuhan

बीजिंग, २४ मे: एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे जागतिक तणाव निर्माण झालेला असताना महाशक्ती बनण्यासाठी मोठमोठे देश शस्त्रांस्त्रांचे भांडार उभे करण्यात व्यस्त आहेत. चीनमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच चीनने समुद्राचे २००० किमी क्षेत्रफळ बंद केले असून ७० दिवसांचा युद्धसराव सुरु केला आहे. चीनच्या मोठमोठ्या शस्त्रांनाही भारी पडेल असे शस्त्र अमेरिकेने विकसित केले आहे.

अमेरिकेच्या नौसेनेने एक उच्च भारित लेझर शस्त्राचे यशस्वीरित्या परीक्षण केले आहे. या लेझर किरणाद्वारे अमेरिकेच्या नौदलाने जहाजावरून विमान उद्ध्वस्त करून दाखविले आहे. महत्वाचे म्हणजे हे परीक्षण प्रशांत महासागरात करण्यात आले. याचे फोटो आणि व्हिडीओ अमेरिकेने प्रसिद्ध केले आहेत.

दुसरीकडे अमेरिकेला चीन आणि रशियापासून धोका असल्याचं सांगत अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अण्विक चाचणी करण्याच्या विचारात आहे. १९९२ मध्ये अमेरिकेनं अखेरची अण्विक चाचणी केली होती. शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील संरक्षण संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबत चर्चा केली. आपल्या शस्त्रास्त्रांची तपासणी करणं आणि नवीन डिझाइन केलेले शस्त्रांचं उत्पादन करणं हा या चाचणीमागील महत्त्वाचा उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे.

मात्र असं असलं तरी कोरोना आपत्तीचा फटका बसल्यानंतर अमेरिका आणि चीनमध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. मात्र आता अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश थेट शीतयुद्धाच्या जवळ असल्याचं विधान चीनच्या परराष्ट्र मंत्र्यानेच केल्याने मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. एएफपी न्युज एजन्सीने त्याबाबत अधिकृत वृत्त दिले आहे.

 

News English Summary: A literal war has erupted between the US and China after the Corona disaster struck. But now that the US and China are both directly close to the Cold War, the Chinese Foreign Minister’s statement is likely to cause a stir. The AFP news agency has given an official report about it.

News English Title: US and China nearing ‘brink of new Cold War Chinese foreign minister News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x