18 January 2025 6:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

अबकी बार ट्रम्प सरकार | मोदींचे मित्र अमेरिकेतून फरार होण्याचा तयारीत? - सविस्तर वृत्त

US President Donald Trump, left the America, Scotland

वॉशिंग्टन, ९ जानेवारी: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने मोठा झटका दिला आहे. ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. चुकीची माहिती आणि ट्विटमुळे दंगल भडकण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याचे ट्विटरने सांगितले आहे. ट्रम्प समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला.

बुधवारी झालेल्या हिंसेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचं अकाउंट 12 तासांसाठी ब्लॉक केलं होतं. त्याशिवाय त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन अनेक ट्विट्सही हटवण्यात आले होते. परंतु आता ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पूर्णपणे सस्पेंड केलं आहे. अशाप्रकारची हिंसा पुन्हा होऊ नये, यासाठी त्यांचं अकाउंट सस्पेंड केल्याचं कारण ट्विटरने दिलं आहे. हिंसाचाराला उद्युक्त करण्याच्या जोखमीमुळे आम्ही त्याचं अकाउंट कायमस्वरूपी सस्पेंड केलं आहे. ट्विटर नियमांचं उल्लंघन केल्यानं हे पाऊल उचलल्याचं, ट्विटरने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, ट्रम्प यांच्यावर चोहोबाजूने टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदाची सूत्रे नवे राष्ट्रपती जो बायडेन यांच्याकडे सोपवण्यापूर्वीच ट्रम्प फरार होण्याची शक्यता आहे. येत्या 20 जानेवारी रोजी जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणआर आहे. परंतु, त्यापूर्वीच म्हणजे 19 जानेवारी रोजीच ट्रम्प हे अमेरिका सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. 19 जानेवारी रोजी ट्रम्प हे स्कॉटलंडला जाणार आहेत. त्यासाठी त्यांचं तयारीही झाली आहे.

त्यामुळे पदावर राहतानाच ट्रम्प देश सोडून जाऊ शकतात, असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीतील पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळेच आपल्या नावापुढे माजी राष्ट्रपती हा शब्दच नको म्हणून त्यांनी अमेरिकेतून फरार होण्याचा प्लान केल्याचंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

विशेष म्हणजे त्यांना तुरुंगात टाकलं जाण्याचीही शक्यता आहे. एका अहवालानुसार, ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात यावा असं 200 हून अधिक खासदारांना वाटत आहे. तात्काळ हा महाभियोग चालवून ट्रम्प यांना 20 जानेवारीपदीच पदावरून हटवण्यात यावं असंही या खासदारांना वाटत आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या पुढच्या काळात सद्दाम हुसैन किंवा गद्दाफी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

 

News English Summary: Trump has been widely criticised. Against this backdrop, Trump is likely to abscond before handing over the reins of the presidency to new President Joe Biden. Joe Biden will be sworn in as President of the United States on January 20. But even before that, on January 19, Trump is ready to leave the United States. Trump will travel to Scotland on January 19. They are also ready for it.

News English Title: US President Donald Trump may left the America news updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x