29 April 2025 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC Yes Bank Share Price | पेनी स्टॉकबाबत अलर्ट, गुंतवणूकदारांनी शेअर BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER
x

कोरोनामुळे हजारो मृत्यूमुखी आणि श्वेतवर्णीय हिंसक आंदोलन; ट्रम्प यांना निवडणुकीत पराभवाची चिंता

US President Donald Trump, US Election 2020

वॉशिंग्टन, १४ जून: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की या महिन्यापासून ते आपली निवडणूक सभा सुरू करणार आहेत. दरम्यान त्यांनी चर्चेत असलेल्या सर्व आशंका फेटाळून लावल्या आहेत. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये पराभव झाला तर कार्ययालय सोडून निघून जाईन. शिवाय ते असं देखील म्हणाले की पुन्हा निवडून आलो नाही तर ती अमेरिकेसाठी सर्वात वाईट गोष्ट असेल.

डोनाल्ड ट्रम्प सध्या निवडणुकीमुळे तणावात आहेत. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेला धमकी देऊन टाकली आहे. जर मी निवडणूक हरलो तर अमेरिकेसाठी वाईट असेल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच हरल्यानंतर काय करणार हे देखील त्यांनी सांगितले आहे.

ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये असलेली नाराजी, कोरोनामुळे होणारे हजारो मृत्यू आणि नुकतीच श्वेतवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या अमानुष हत्येमुळे सुरु असलेले हिंसक आंदोलन येती राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक सोपी नसल्याचे दिसत आहे. यामुळे ट्रम्प यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोद यांनी ट्रम्प यांच्यासाठी मोठे कार्यक्रमही घेतले होते.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून निवडणूक रॅली बंद आहेत. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्याला सुरुवात करणार आहेत. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत, जुलैमध्ये याची अधिकृत घोषणा होईल.

दुसरीकडे डेमोक्रॅट्स पक्षाचे उमेदवार असलेले बिडेन यांनी उमेदवाराला पाहिजे तितकी मते मिळविली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की ते सुरुवातीला टेक्सास, फ्लोरिडा, रिझोना आणि उत्तर कॅरोलिना येथे निवडणूक बैठका घेतील. यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार असून 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

 

News English Summary: Donald Trump is currently under tension due to the election. This has once again threatened the United States. “If I lose the election, it will be bad for America,” he said. He also said what he will do after losing.

News English Title: US President Donald Trump says he will leave office peacefully if loses election News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या