23 February 2025 2:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण

US President Donald Trump, Tests Covid 19 Positive, US Prudential Debates

वॉशिंग्टन, २ ऑक्टोबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही करोनाची बाधा झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी नजीकचा सहकारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर करोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण तात्काळ क्वारंटाइन प्रक्रिया सुरु केली असल्याचं सांगितलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. होप हिक्स, कोणतीही सुटी न घेता अथक काम करत होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. धक्कादायक असून माझी पत्नी मेलानिया आणि मी आमच्या चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. यादरम्यान आम्ही क्वारंटाईन प्रक्रिया सुरु केली आहे, असे ट्रम्प त्यांनी म्हटले होते. आता कोरोनाचा अहवाल आल्यानंतर त्यांनी याची माहिती देत उपचार सुरु केल्याचे म्हटले आहे.

याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत आपली सल्लागार होप हिक्सला करोनाची लागण झाली असून आपण क्वारंटाइन होत असल्याची माहिती दिली होती. “अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्या होप हिक्सचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक…फर्स्ट लेडी आणी मी आमच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. आम्ही क्वारंटाइनची प्रक्रिया सुरु केली आहे,” असं त्यांनी म्हटलं होतं.

 

News English Summary: US President Donald Trump said late on Thursday that he and First Lady Melania Trump have tested positive for Covid-19 and have been quarantined after a top aide tested positive for coronavirus, in a shock development that disrupts his scheduled public appearances in the crucial final weeks of the election campaign.

News English Title: US President Donald Trump Tests Covid 19 Positive Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x