बायडेन यांचा विजय नक्की मानला जात आहे | पण ट्रम्प यांच्या मनात काय शिजतंय?
वॉशिंग्टन, ७ नोव्हेंबर: अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होण्यासाठी किमान २७० इलेक्टोरल कॉलेज व्होट आवश्यक असतात. बायडेन (Joe Biden) यांनी एकूण २६४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळवले आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांना आतापर्यंत २१४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी असलेले बायडेन २००९ ते २०१७ या कार्यकाळात अमेरिकेचे उपाध्यक्ष होते. या कार्यकाळात बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ओबामांच्या नंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्षपदी (US President Donald Trump) विराजमान झाले. सध्याच्या निवडणुकीत पराभव झाल्यास अमेरिकेच्या व्यवस्थेनुसार २० जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प पदमुक्त होतील आणि बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेतील. मात्र ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांच्या मनात नेमका कोणता कट शिजतोय अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
कारण फिलाडेल्फिया येथे मतमोजणी केंद्राजवळ दोन बंदुकधाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी बंदुका जप्त केल्या आहेत. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असल्याचं वृत्त आहे. दरम्यान पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, अॅरिझोना येथील मतमोजणी अजून सुरू आहे. तर या मतमोजणीत अनेक ठिकाणी बायडेन हेच आघाडीवर आहेत. याच कारणामुळे निकाल जाहीर होण्यास वेळ लागला तरी बायडेन यांचा विजय होण्याची शक्यता अधिक दिसत आहे.
एकाबाजूला बायडेन यांच्या विजयाचे चित्र असल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षात (Democratic Party) आनंदाचे वातावरण आहे. तर ट्रम्प यांच्या पराभवाची शक्यता दिसू लागल्यामुळे रिपब्लिकन पार्टीचा (Republican Party) मतमोजणीतील उत्साह मावळत असल्याचे चित्र आहे तर अनेक ठिकाणी रिपब्लिकन पार्टीचे गडबड गोंधळ घालत आहेत.
विशेष म्हणजे एकूण कल पाहता अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांचा विजय नक्की मानला जात आहे. दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प परभवाच्या छायेत असतानाही तो मान्य करण्यास तयार नाहीत. डोनाल्ड ट्रम्प वारंवार मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करत असून कोर्टातही धाव घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत जो बायडेन यांना चुकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करु नये अशा इशारा दिला आहे. दरम्यान जो बायडेन यांच्या प्रचार टीमने ट्रम्प यांनी पराभव स्वीकारण्यास नकार दिला तर व्हाइट हाऊसमधून एस्कॉर्ट केलं जाईल असं सांगितलं आहे. एएफपीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
News English Summary: At least 270 electoral college votes are required to run for president in the United States. Joe Biden received a total of 264 electoral college votes. Trump, on the other hand, has received 214 electoral college votes so far. Biden, a rival of Donald Trump, was vice president of the United States from 2009 to 2017. During this time, Barack Obama was the President of the United States. After Obama, Donald Trump became the President of the United States. In the event of a defeat in the current election, Trump will step down on January 20, 2021, and Biden will be sworn in as president. But the political debate has begun in the minds of Trump and his supporters.
News English Title: US Presidential election 2020 Joe Biden Vs Donald Trump tough fight News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO