23 December 2024 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मोदींचे मित्र मतदाराला नकोसे | ७२% अमेरिकी भारतीयांचा बायडन यांना पाठिंबा

US Presidential Election 2020, American Indians, Donald Trump

वॉशिंग्टन, ३१ ऑक्टोबर: अमेरिकेत हाउडी मोदी इव्हेंट वाया गेल्याची चर्चा रंगली आहे. त्याला सध्या तसंच कारण समोर आलं आहे. इतकंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा देखील कुचकामी ठरल्याचं असं म्हणावं लागेल. अमेरिकेतील भारतीय वंशीयांंपैकी ४८ टक्के जणांचा पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा आहे. मात्र, त्यातील २२ टक्के लोकच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘अमेरिकी मोदी’ असे संबोधल्या जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करणार आहेत.

अमेरिकेत एका पाहणीत हा निष्कर्ष आला आहे. त्या देशातील ३२ टक्के भारतीय वंशीयांचा मोदी यांना विरोध आहे, तर २० टक्के जणांनी मत व्यक्त करण्यास नकार दिला. निवडणुकीत डेमोक्रॅटिक उमेदवार ज्यो बायडन यांना ७२ टक्के भारतीय वंशीय मतदान करणार आहेत.

भारत-अमेरिकेतील संबंध सध्या अधिक घनिष्ठ झाले आहेत. मात्र, या मुद्द्याने प्रभावित होऊन भारतीय वंशीय ट्रम्प यांना भरघोस मतदान करण्याची शक्यता नाही, असेही या पाहणीत म्हटले आहे. लोकसंख्येत भारतीयांचे प्रमाण १ टक्का आहे. त्यातही मतदार असलेले १ टक्क्याहून कमी आहेत.

दरम्यान, अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक 3 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत मूळचे भारतीय वंशाचे 2 अमेरिकी नागरिक उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि पार्टी फॉर सोशलिझम अँड लिबरेशनचे (पीएसएल) उमेदवार सुनीला फ्रीमन. जरी सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा कमला हॅरिस या सोशलिस्ट म्हणजे समाजवादी असल्याचं आपल्या भाषणांतून सांगितलं असलं तरीही फ्रीमन हे कट्टर समाजवादी अजेंडा असलेले उमेदवार आहेत.

 

News English Summary: There is talk in the US that the Howdy Modi event was wasted. He is currently facing the same reason. Not only that, but Donald Trump’s visit to India was also ineffective. Prime Minister Modi has the support of 48% of Indians of American descent in the United States. However, only 22 per cent of them will vote for Donald Trump, known as the “American Modi” in the presidential election. This is the conclusion of a survey conducted in the United States. Modi is opposed by 32 per cent of Indians in that country, while 20 per cent refused to vote. Democratic candidate Joe Biden will get 72% of Indian votes in the election.

News English Title: US Presidential Election 2020 only 22 percent Indians will vote Donald Trump News Updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x